कुंभमेळ्यातील दुर्घटनेचे सत्य काय?:15 हजारांत बोळवण; मृतदेह गावी पाठवले, पण प्रशासनाचे मौन

प्रयागराज कुंभमेळ्याच्या प्रशासनाने माैनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा अधिकृत आकडा आतापर्यंत जाहीर केलेला नाही. त्यामुळे चेंगराचेंगरीत आप्तांना गमावणारे किंवा बेपत्ता झालेले नवीन लाेक राेज समाेर येत आहेत. असेच एक प्रकरण राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील आहे. स्यार गावातील न्यालीदेवी रामनारायण बैरवा (६२) यांचा अमावास्येच्या रात्री १ ते २ दरम्यान संगमावरील चेंगराेचेंगरीत तुडवल्या गेल्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ठेवलेल्या पांढऱ्या बॅगेवर ‘४८’ क्रमांक लिहिलेला हाेता, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. परंतु पायाच्या तळव्यावर मात्र ‘६१’ लिहिलेले दिसले हाेते. कुंभ प्रशासनाने मात्र चेंगराचेंगरीत केवळ ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मग मृत्यू ३० झालेले असतील तर बॅगवर ४८ का लिहिलेले हाेते आणि ६१ असेही का हाेते? त्यात नुकसान भरपाईबाबत पाेलिस किंवा प्रशासनाने काहीही माहिती दिली नसल्याचे न्यालीदेवींचे पत्नी रामनारायण यांनी सांगितले. रामनारायण म्हणाले, २२ जानेवारी राेजी आम्ही इतर ५६ जणांसाेबत कुंभाला गेलाे हाेते. माैनी अमावास्येला आम्ही रात्री मेळ्यात कुमारियाचे बाबाजी यांच्या आश्रमात विश्रांतीला हाेताे. अमृतस्नानासाठी रात्री १२ वाजता संगमाकडे निघालाे. स्नानाहून परतताना ये-जा करण्याचा एकच रस्ता असल्याने ताे जाम झाला. त्यातच चेंगराचेंगरी झाली आणि पत्नी हरवली.नंतर तिचा मृतदेह रुग्णालयात असल्याचे समजले. यादरम्यान एका व्यक्तीने माझे नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक इत्यादी माहिती घेतली. मृत्यू प्रमाणपत्र न देता ा एकाने लिफाफ्यात १५ हजार रुपये दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह घेऊन सायंकाळी ६ वाजता रवाना झालाे. आणि ६१ असेही का हाेते? त्यात नुकसान भरपाईबाबत पाेलिस किंवा प्रशासनाने काहीही माहिती दिली नसल्याचे न्यालीदेवींचे पत्नी रामनारायण यांनी सांगितले. रामनारायण म्हणाले, २२ जानेवारी राेजी आम्ही इतर ५६ जणांसाेबत कुंभाला गेलाे हाेते. माैनी अमावास्येला आम्ही रात्री मेळ्यात कुमारियाचे बाबाजी यांच्या आश्रमात विश्रांतीला हाेताे. अमृतस्नानासाठी रात्री १२ वाजता संगमाकडे निघालाे. स्नानाहून परतताना ये-जा करण्याचा एकच रस्ता असल्याने ताे जाम झाला. त्यातच चेंगराचेंगरी झाली आणि पत्नी हरवली.नंतर तिचा मृतदेह रुग्णालयात असल्याचे समजले. यादरम्यान एका व्यक्तीने माझे नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक इत्यादी माहिती घेतली. मृत्यू प्रमाणपत्र न देतांना एकाने लिफाफ्यात १५ हजार रुपये दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह घेऊन सायंकाळी ६ वाजता रवाना झालाे.

Share