लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, तिच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिन्याच्या सन्मान निधीबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती की, पैसे नेमके कधी मिळणार. आता यासंदर्भात प्रतीक्षा संपली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. या निधीचे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जातो. तसेच, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांची मदत दिली जाते. जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महायुती सरकारने एकूण 28290 कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने निधी वर्ग करण्यास मंजुरी दिल्यामुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना येत्या दोन ते तीन दिवसांत जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी मिळण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासूनचा 13 वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता वेळेवर मिळणार असल्याने महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.