50% पेक्षा कमी मतदान झालेल्या वसाहतींत कर्मचाऱ्यांकडून गृहभेटी:आशा, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी, बचतगटांचा उपक्रम ‎

महापालिका क्षेत्रात यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या वसाहतींत पालिका कर्मचाऱ्यांची पथके गृहभेटी करत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणार आहेत. यासाठी आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गणेश शिंदे यांनी आशा वर्कर, अंगणवाडीसेविकांची बैठक घेऊन गृहभेटीचा आराखडा स्पष्ट केला. मनपा सभागृहात उपायुक्त शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आशा वर्कर व अंगणवाडीसेविकांची बैठक झाली. यात मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने मतदारांचा कसा फायदा होणार आहे, हे सांगून मतदारांची उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न करणे हे तयार करण्यात आलेल्या गटाचे मुख्य काम आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका, महिला बचतगट, सहकारी संस्थांचे कर्मचारी, प्रतिनिधींचा गट तयार करून जनजागृती करताना मतदार यादीत मतदाराचे नाव, केंद्र, भाग क्रमांकाची माहिती असलेल्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येईल. मतदान दिवसाची आठवण करून देत मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. या बैठकीस डॉ. जयश्री आहेर, डॉ. ऋषिकेश साळुंखे उपस्थित होते. प्रतिनिधी | कळवण विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू असून निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील आशा वर्कर आणि अंगणवाडीसेविकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागात गृहभेटींद्वारे कुटुंबापर्यंत पोहोचून मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. १९ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात यावे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी गृहभेटी करत मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात यावे. ज्या मतदान केंद्रावर ५० टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले आहे अशा मतदान केंद्राच्या परिसरात गृहभेटी उपक्रम राबविण्यात यावा. या उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जात त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात जनजागृती करण्याच्या सूचना नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी दिल्या. यावेळी आशासेविका उपस्थित होत्या. केंद्रस्थानी नवमतदार आगामी विधानसभा मतदानाच्या दिवशी मतदारांचे बाहेरगावी फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन असल्यास त्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून देण्यात यावी. मतदानासाठीच्या १२ दस्तावेजांची माहिती द्यावी. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. विशेषतः नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना आशासेविका आणि अंगणवाडीसेविकांना देण्यात आल्या. मतदार यादीत मतदाराचे नाव आहे का सांगावे. यादीत नाव तपासण्याची माहिती द्यावी. मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक असलेल्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करावे. मतदार मार्गदर्शिकांचे वाटप करावे. मतदान दिवसाची आठवण करून द्यावी. त्या दिवशी फिरायला जाण्याचे किंवा गावी जाण्याचे नियोजन असल्यास त्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा. मतदार ओळखपत्र नसेल तर त्याऐवजी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या १२ दस्तावेजांची माहिती द्यावी. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. अशा सूचना आशासेविका आणि अंगणवाडीसेविकांना देण्यात आल्या.

  

Share