नोकरीचे दैनंदिन काम संपवून थेऊर फाटा येथून खासगी पिकअप चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिकअप चालक नंदु जाधव (२५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही दैनंदिन नोकरीचे काम आटोपून थेऊर फाटा येथून राहत्या घरी जाण्याकरता खासगी वाहनाची वाट पाहत हाती. यावेळी नंदु जाधव हा पिक घेऊन तरुणी उभी असलेल्या ठिकाणी आला. त्याने तरुणीला गाडीत बसण्याकरिता विचारणा केली. त्यानुसार होकार देत तरुणी आरोपीच्या पिकअपमध्ये बसली. यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लील स्पर्श करून खांद्यावर हात टाकला. त्यानंतर त्याने तिला काय होतंय एवढं, मला भाडे देवु नका, फक्त खुश करा, असे म्हणून तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बालविवाह लावुन देणे भोवले, आई-वडील नातेवाईकांवर गुन्हा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना मुलीचा विवाह लावुन तिच्यावर झालेल्या लैगिक अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली. तिच्यावर अत्याचाराला कारणीभुत असलेल्या व बालविवाह लावुन देणार्या तिच्या आई-वडील तसेच सासु-सासर्यांसह एकूण नातेवाईकांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मार्च २०२४ ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला. याबाबत एका १८ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. तरुणीचा पाठलाग करून विनयभंग तरुणीला शेरोशायरी मॅसेज करून तु आज कोणत्या रंगाची साडी ड्रेस नेसला होता, त्यामध्ये तु खुप सुंदर दिसत होती, मी त्याच रंगाचा शर्ट मागवला आहे अशा प्रकारचे व तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असेही मॅसेज पाठवले. तसेच तिचा छुपा पाठलाग करून तिचा विनयभंग करणार्या एकावर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.