बेळगावमध्ये आरक्षण मागणाऱ्या लिंगायत समाजबांधवांवर लाठीमार:10 टक्के आरक्षण वाढवून देण्यासाठी समाजाचा विधानभवनावर भव्य मोर्चा

ओबीसी कोट्यातील आरक्षण वाढवण्याच्या मागणीसाठी बेळगावातील विधानभवनावर (सुवर्ण विधानसाैंध ) धडक देणाऱ्या पंचमसाली लिंगायत समाजबांधवांवर मंगळवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. कुदलसंगमा पंचमसील पीठाचे आचार्य बसव जया मृत्यूंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी बॅरिकेड तोडून विधिमंडळावर धडक देणाऱ्या मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या वेळी आंदोलकांनी आमदार तसेच शासकीय वाहनांची तोडफोड केली. आंदोलनाला विरोध नाही मोर्चेकऱ्यांच्या १० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले, पण ते आले नाहीत. आता विधिमंडळाचे कामकाज तहकूब झाल्याने मी निघालो. लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क आहे, आमचा विरोध नाही, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. १०% आरक्षण वाढवण्याची मागणी पंचमसाली लिंगायत समुदायाला ओबीसी कोट्यात सध्या ३ ब प्रवर्गात ५ टक्के आरक्षण आहे. मात्र २ अ प्रवर्गात समावेश करून आरक्षण १५ टक्के करावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Share