साहित्य वार्ता:सुधीर रसाळ यांना मुक्तसृजन संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; 11 ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये होणार सोहळा साहित्य वार्ता:सुधीर रसाळ यांना मुक्तसृजन संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; 11 ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये होणार सोहळा

साहित्य वार्ता:सुधीर रसाळ यांना मुक्तसृजन संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; 11 ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये होणार सोहळा

मराठीतील ऋषितुल्य साक्षेपी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना मुक्तसृजन संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश खरात यांनी दिली. रोख 11000 रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. सुधीर रसाळ हे मराठीतील नामवंत, व्यासंगी समीक्षक, अभ्यासक, संशोधक म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. मान्यवरांची उपस्थिती सुधीर रसाळ यांचा सन्मान सोहळा 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होईल. नवी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे चेअरमन प्रो. मिलिंद मराठे यांच्या शुभहस्ते देऊन हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी डॉ. सुधीर रसाळ व त्यांच्या समीक्षेबद्दल विश्वकोष निर्मिती मंडळ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व इतिहास तज्ज्ञ हे भाष्य करणार आहेत. या जीवनगौरव पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे संचालक प्रो. विश्वनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ समीक्षक प्रो. प्रभाकर बागले हे भूषवणार आहेत. एकमुखाने निर्णय प्रा. डॉ.सुधीर रसाळ पुरस्कार गौरव समितीत मुक्त सृजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश खरात, सचिव डॉ. संतोष देशमुख, निमंत्रक उमेश काळे, उपाध्यक्ष डॉ.किसन माने, संयोजक प्रिया धारूरकर, कोषाध्यक्ष नीलेश देगावकर, निमंत्रक हनुमंत सोनवणे, संयोजक डॉ. संभाजी पाटील, डॉ. राजश्री पवार, कवयित्री माधुरी चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ, कवी विवेक जोशी, कवयित्री शमा बर्डे, डॉ. संयोगिता थोरात , कवयित्री राधिका बनकर आदी आहे. या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. कविता आणि प्रतिमा सुधीर रसाळ यांचा ‘कविता आणि प्रतिमा’ हा ग्रंथ तर मराठीतील कवितेच्या अभ्यासकांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. त्यांनी ‘कविता आणि प्रतिमा,काही मराठी कवी:जाणीव आणि शैली,वाड्मयीन संस्कृती, ना.घ.देशपांडे यांची कविता, मर्ढेकरांच्या कविता: जाणिवांचे अंतःस्वरूप, मर्ढेकरांची कविता:आकलन आणि विश्लेषण,कविता निरूपणे, मर्ढेकरांचे कथात्म वाङ्मय, भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, समीक्षा आणि समीक्षक, कवितायन-विंदा करंदीकरांची कविता, काव्यालोचना, विंदांचे गद्यरूप, काही नाटके आणि नाटककार, सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी, लोभस, माणसं जिव्हाळ्याची अशा परिपूर्ण आणि समृद्ध १९ ग्रंथांनी व चार संपादने आदी ग्रंथांची निर्मिती केली आहे. अनेक पुरस्कारांनी गौरव सुधीर रसाळ यांना राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी आणि जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या प्रतिष्ठानचे संपादक म्हणून काम केलेले आहे. तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही उत्तमरित्या कार्य केलेले आहे. एक प्राध्यापक म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यापनावर ठसा उमटवलेला आहे. महाराष्ट्र, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातच त्यांचे मराठी विषयाचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आपल्याला दिसून येतात. संबंधित वृत्त स्वातंत्र्य संपू लागलं की संस्कृती रसातळाला जाते:साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी सुधीर रसाळांचे प्रतिपादन; वाचा रोखठोक मुलाखत! VIDEO सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च सन्मान मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद!​​​​​​​

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *