लोहोणेर जनता विद्यालयास सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद:12 शाळांतील 250 विद्यार्थ्यांचा सहभाग

लोहोणेर येथील मविप्रच्या जनता विद्यालयाने केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात विजयाची हॅट‌्ट्रिक केली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. समूहगीत व समूहनृत्य प्रकारात प्रथम तर एकपात्री नाट्य अभिनयात द्वितीय क्रमांक मिळवला. लोहोणेर येथील जनता विद्यालयात केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सव पार पडला. अध्यक्षस्थानी मविप्रचे तालुका संचालक विजय पगार होते. यात समूहगीत, एकपात्री आणि समूहनृत्य असे तीन स्पर्धा प्रकार ठेवले होते. महोत्सवात लोहोणेरसह पाळे, मोकभणगी, देवळा, वासोळ, कुंभार्डे, चिंचपाडा, पिंपळगाव (वा), बेज, रामेश्वर, सावकी व खामखेडा शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात प्रथम व द्वितीय आलेल्या स्पर्धकांची नाशिक येथील जिल्हास्तरीय महोत्सवासाठी निवड करण्यात आली. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक आर. एच. देसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राकेश थोरात व सुनील एखंडे यांनी केले. स्पर्धेचा निकाल समूहगीत : जनता विद्यालय लोहोणेर (प्रथम), महात्मा फुले हायस्कूल बेज (द्वितीय), जनता विद्यालय पिंपळगाव (तृतीय), जनता विद्यालय चिंचपाडा व जनता विद्यालय व अभिनव देवळा (उत्तेजनार्थ) एकपात्री नाट्य : जनता विद्यालय व अभिनव देवळा (प्रथम), जनता विद्यालय लोहोणेर (द्वितीय), जनता विद्यालय रामेश्वर (तृतीय), जनता विद्यालय खामखेडा व जनता विद्यालय सावकी (तृतीय) समूहनृत्य : जनता विद्यालय लोहोणेर (प्रथम), जनता विद्यालय कुंभार्डे (द्वितीय), इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ (तृतीय), महात्मा फुले हायस्कूल बेज व महात्मा फुले हायस्कूल मोकभणगी (उत्तेजतार्थ)

  

Share