लोकसभेत विशेष चर्चा:पाकिस्तानने गुडघे टेकवलेले असतानाही सरकारने युद्धबंदी कशी काय केली- हुड्डा, विरोधकांनी विचारले- पहलगामच्या चुकीसाठी कोण जबाबदार?

सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांना जोरदार कोंडीत पकडले. या वेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी सरकारला विचारले की पाकिस्तानने गुडघे टेकवले होते. मग कोणत्या अटींवर युद्धबंदी करण्यात आली? हुड्डा म्हणाले, भारत ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानवर मात करत होता तेव्हा सरकारने युद्धबंदीचा निर्णय का घेतला? १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करून इंदिरा गांधींनी दिलेले उत्तर द्यायला हवे होते, अशी देशाची इच्छा होती. हुड्डा म्हणाले, अमेरिकेने सरकारसमोर युद्धबंदीची घोषणा कशी केली? अमेरिका पाकिस्तानची भारताशी तुलना करू शकत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २८ वेळा म्हटले आहे की त्यांनी भारताला व्यापाराची धमकी देऊन युद्धबंदी पूर्ण केली. ते भारताचे लढाऊ विमान पडल्याबद्दलही बोलले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही त्यांचे वक्तव्य नाकारले नाही. सरकारने अमेरिकेशी हातमिळवणी करायची की डोळे दाखवायचे हे ठरवावे लागेल. प्रणिती शिंदे: परराष्ट्र धोरण लज्जास्पद, शेजारील देशांची चीनशी हातमिळवणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भारताचे परराष्ट्र धोरण लज्जास्पद बनले आहे. आपले शेजारी देश बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका – जे एकेकाळी भारताच्या जवळ होते, ते चीनशी हातमिळवणी करत आहेत. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा कधीच इतकी कमकुवत नव्हती. पहलगाममधील चुकीसाठी कोण जबाबदार आहे? कल्याण बॅनर्जी: ९० धावांवर कुणी डाव घोषित करू शकतो का, मोदीजींनी ते केले चर्चेदरम्यान तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही भाषण केले. त्यांनी युद्धबंदीबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मोदीजींनी ९० धावांवर डाव घोषित केल्याचे सांगितले. ९० धावा झाल्या आहेत व कुणीतरी डाव घोषित करा असे म्हणेल. हे फक्त मोदीजीच करू शकतात. वेंकटेशन: सौदीहून येताच पंतप्रधान बिहार निवडणुकीत व्यग्र, काश्मीरला गेले नाही सीपीआयएमचे खासदार वेंकटेशन म्हणाले की, जेव्हा पहलगाम हल्ल्यामुळे देश दुःखी होता, तेव्हा सौदी अरेबियाहून परतल्यानंतर पंतप्रधान काश्मीरला जाण्याऐवजी बिहारला निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले. बैजयंत पांडा: भारताने शांतीचा हात पुढे केला, पाकने अतिरेक्यांचा मार्ग स्वीकारला भाजप खासदार बैजयंत पांडा म्हणाले, पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा इतिहास आहे. देशाने तो थांबवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारताने प्रत्येक वेळी शांतीचा हात पुढे केला. अनुराग ठाकूर: अक्साई चीन चीनला देऊन काँग्रेसने मोठी चूक केलीय भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, गजवा-ए-हिंद आणि भारताचे हजारो तुकडे करण्याचे षड‌्यंत्र रचणारे जिहादी आपल्या सैन्यासमोर ४८ तासही टिकू शकले नाहीत. काँग्रेसने इतिहासात अनेक चुका केल्या. काँग्रेसने काश्मीरमुद्दा यूएनमध्ये नेऊन, अक्साई चीन चीनला व कच्छतीवू बेट श्रीलंकेला देऊन शरणागती पत्करली. लल्लन सिंह: विरोधी पक्षातील लोकांना ऑपरेशन सिंदूरचे यश दिसत नाही पंचायतराज मंत्री व जेडीयू खासदार लल्लन सिंह म्हणाले की, विरोधकांना ऑपरेशन सिंदूरचे यश दिसत नाहीये. विरोधक वारंवार म्हणतात की पंतप्रधान बोलत नाहीत, त्यांनी बोलावे. अरे, पंतप्रधान बोलत नाहीत, ते कृती करतात. ते कृती करून त्यांची ताकद दाखवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *