भगवान शिवाला समर्पित मंदिर जिथे सर्वात वजनदार शिवलिंग:151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो शुद्ध पारा असलेला महादेव भगवान शिवाला समर्पित मंदिर जिथे सर्वात वजनदार शिवलिंग:151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो शुद्ध पारा असलेला महादेव

भगवान शिवाला समर्पित मंदिर जिथे सर्वात वजनदार शिवलिंग:151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो शुद्ध पारा असलेला महादेव

देवांचा देव महादेवाला श्रावण महिना खूप प्रिय आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हा महिना शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम बोले’ च्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यासोबतच शुभ फळ मिळविण्यासाठी उपवास देखील केला जातो. श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरांत भजन आणि कीर्तनांचे आयोजन केले जाते. अशा या पवित्र महिन्यात श्रावणी सोमवारी भगवान शिवाजी पुजा आणि आराधना केल्याने इच्छित कामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आपण छत्रपती संभाजीनगर शहराचे आराध्य दैवत असलेल्या खडकेश्वर महादेव मंदिराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले होते. आज आपण पाहणार आहोत शहराच्या जवळच असलेल्या अनोख्या मंदिराचा वृत्तांत. श्रावण महिन्यात सर्वच शिवभक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची आराधना करतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान शिवाला समर्पित एक असे मंदिर देखील आहे, जिथे सर्वात वजनदार शिवलिंग आहे. असे मानले जाते की या शिवलिंगाची पूजा केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या आजारांपासून आणि त्रासांपासून मुक्तता मिळते. चला, या मंदिराबद्दल जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून… भगवान शिवाला समर्पित मंदिर छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या पळशी गावाच्या शिवारात आहे श्री पारदेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर गेल्या 25 वर्षांपासून लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, पारदेश्वर महादेव मंदिरात बसलेल्या शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा केल्याने साधकाला अनेक यज्ञांचे फळ मिळते. श्रावण महिन्यात येथे जास्त गर्दी दिसून येते. येथे अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असे म्हटले जाते की कोणताही शिवभक्त दरबारात डोके टेकल्यानंतर रिकाम्या हाताने जात नाही. मंदिरात 111 किलो वजनाचे पारापासून बनलेले एक मोठे शिवलिंग आहे. पारदेश्वर शिवलिंग पारा पासून बनलेले आहे. तर 151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो पारापासून बनलेले लिंग ठेवले आहे.असे मानले जाते की या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने ज्योतिर्लिंग आणि अनंत कोटी शिवलिंगाचे आशीर्वाद मिळतात. मंदिराचे वर्णन आणि धार्मिक महत्त्व पारदेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मुख्य देवता श्री पारदेश्वर महादेव विराजमान आहेत. मंदिरातील मुख्य शिवलिंग पारा म्हणजेच Mercury पासून बनवलेले असून, त्याचे वजन अंदाजे 111 किलो इतके आहे. पारा हा द्रवरूप “तेजो लिंग” म्हणून समजला जातो आणि त्याला ज्योतिर्लिंगांच्या समकक्ष आध्यात्मिक महत्त्व आहे. भवन रचना आणि स्थापत्यशास्त्र या मंदिराची बांधणी सुसज्ज मार्बल वापरून केली गेली आहे. समाधानी वातावरण, वास्तु कलेतील सूक्ष्म नक्षीकाम, आणि अत्यंत निर्मळ मंदिर परिसर भक्तांसाठी शांतता व दिव्यता अनुभवण्याचे ठिकाण मानले जाते. मंदिर परिसरात इतर लहान देवतांची मंदिरे आणि गर्भगृह आहेत. साधना आणि धार्मिक उत्सव मंदिरात शिवपूजा, शिवरात्र, श्रावण काळातील विशेष उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. लोक पुराण, रुद्राभिषेक, साधना यांसारख्या पूजा विधी येथे पार पडतात. हे महाराष्ट्रातले अगदी खास पारा पासून बनवलेले शिवलिंग असणारे मंदिर असून त्याची मार्मिक आणि चिंतनशील वातावरण भक्तांना अनन्य अनुभव देते. धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य शास्त्रीय दृष्ट्या महत्व असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील तीर्थ यात्रीसाठी विशेष आकर्षण ठरते.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *