अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समिती, तसेच इतर पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मंजुरी दिल्याची घोषणा केली. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. या नवीन रचनेनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये रमेश चेन्निथला (प्रभारी-अध्यक्ष), हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी, सुनील केदार, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे, मुझफ्फर हुसेन, के. सी. पाडवी, अस्लम शेख, विश्वजीत कदम, कल्याण काळे, प्रा. वसंत पुरके, अमीन पटेल यांचा समावेश आहे. याशिवाय, महिला काँग्रेस अध्यक्षा, युवक काँग्रेस अध्यक्ष, सेवा दलाचे मुख्य समन्वयक, एनएसयूआय अध्यक्ष, आयएनटीयूसी अध्यक्ष, आणि एससी विभागाचे अध्यक्ष हे देखील या समितीचे सदस्य असतील. ॲड. गणेश पाटील यांना निमंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, एआयसीसी सचिव, प्रभारी, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील एआयसीसी सचिव व संयुक्त सचिव हे पदसिद्ध सदस्य असतील. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष