महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात 1.25 लाख उद्योजक घडतील आणि 50 हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. तसेच वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप उद्योग आहेत. 31 मे 2025 पर्यंत राज्यातील स्टार्टअप उद्योगांची संख्या 29 हजार 147 आहे. देशाच्या एकूण स्टार्टअपच्या संख्येत 18 टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. स्टार्टअप उद्योगांना अधिक प्रभावी परिसंस्था तयार करण्यासाठी कालसुसंगत नवीन धोरण आखण्यात आले आहे. या धोरणात नवोपक्रम, उद्योजक, गुंतवणुकदार यांच्यासाठी प्रभावी इकोसिस्टम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा “महा-फंड”, ज्यामध्ये 500 कोटी रुपयांचा निधी असून, यामार्फत सुरुवातीच्या टप्प्यातील 25 हजार उद्योजकांना मार्गदर्शन, इन्क्युबेशन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय