Maharashtra

सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का:प्रदेश कार्याध्यक्ष फारूख शाब्दिंचा राजीनामा, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी ...

सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर:माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पुन्हा संधी, इतर उमेदवार कोण?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. सोल...

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मोठा धक्का!:कॉंग्रेसच्या अधिकृत उमेवाराचा एमआयएममध्ये प्रवेश, अपमानास्पद वागणुकीमुळे घेतला निर्णय

महापालिका निवडणुकांची जय्यत तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. जागावाटप आणि उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर करणे सुरू झाले आहे. कॉंग्रेस पक्षाने सोलापूर आणि कोल्हापूर येथील उमेदवारांची य...

सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे:अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात

"गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे," अशा शब्दांत राष्ट्र...

मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् 'वंचित बहुजन'चे ठरले:भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढणार, काँग्रेसच्या स्थापना दिनी युतीची अधिकृत घोषणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृ...

खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्रीला बेड्या:गुन्हे खटला मिटवण्यासाठी बिल्डरकडे मागितले 10 कोटी रुपये; कोर्टाकडून पोलिस कोठडीत वाढ

गोरेगाव येथील एका प्रतिष्ठित बिल्डरला 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून खंडणीविरोधी पथकाने अभिनेत्री हेमलता पाटकर उर्फ हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांना बेड्या ठोकल्या आहे...

गौतम अदानी बारामती दौऱ्यावर:रोहित पवार बनले सारथी, तर शेजारी बसले अजितदादा; 'शरद पवार एआय सेंटर'चे उद्घाटन

अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे नवे नियम:EVM वरील उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलला, कशी असणार क्रमवारी?

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या अद्याक्षराप्रमाणे असणारा निवडणूक रिं...

मतांसाठी काहीही!:अमित साटम यांनी स्वतः 'बूट पॉलिश' करत वेधले लक्ष; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज

निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना जनतेच्या चरणी लीन होताना आपण पाहतोच, पण मुंबईत भाजप आमदार अमित साटम यांनी तर थेट 'पायालाच' हात घातला आहे. सोमवारी साटम यांनी चक्क बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या जाग...

नांदेड हादरले!:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपहरण करून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असतानाच, आज नांदेडमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे प...

राज्यातील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिकची, तर अरुण एम. यांच्यावर गडचिरोलीची जबाबदारी

राज्यात नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने आज तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्...

पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय?:सुनील तटकरेंचा भरत गोगवलेंना टोला, महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अलिबाग, महाड आणि विशेषतः तटकरेंचा ब...

चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकाल:काँग्रेसचे वर्चस्व, मात्र भद्रावतीत भाजपच्या वृषाली पांढरेंचा 'एक' मताने थरारक विजय

चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, यात काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच...

केडीएमसीमध्ये महायुतीला तडा?:एकनाथ शिंदे म्हणतात ‘एकत्र’, तर रवींद्र चव्हाणांचा ‘स्वबळा’चा नारा; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्...

मुंबईत भाजपला रोखण्यासाठी 'मविआ'ची मोर्चेबांधणी:संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष ...

सिंधुदुर्गात बाहेरचे, घरचे सगळे फॅक्टर होते:युती का झाली नाही याचे उत्तर नीलेशजींकडेच, कणकवलीच्या पराभवावर नितेश राणे स्पष्टच बोलले

नगरपालिकेच्या निवडणुकांचा रविवारी निकाल लागला आणि महायुतीने विशेषतः भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु...