महिलांनी स्वत:चे महत्त्व आणि निर्णय घेण्याची भावना म्हणजे सक्षमीकरण:लासलगाव येथील कार्यक्रमात सुवर्णा जगताप यांचे प्रतिपादन
महिलांची स्वतःचे महत्त्व ओळखण्याची भावना, निवड करण्याचा आणि निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार, घराच्या आत आणि बाहेर स्वतःच्या जीवनावर, सामाजिक दिशांवर प्रभाव पाडण्याची त्यांची क्षमता हेच महिला सक्षमीकरण असल्याचे मत लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार वस्त्रोद्योग, हातमाग आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या पुढाकारातून लासलगाव येथे महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. पाच जिल्ह्यांचे काम सांभाळत असलेले कोल्हापूर येथील केंद्र सरकारचे प्रतिनिधी आकाश मुळीक यांनी नाशिक जिल्हा कोठ्यातील प्रलंबित कामे लवकर करण्यात येतील, असे नमूद केले. हस्तकला हातमाग संबंधित कार्ड लवकरच वितरीत करण्यात येतील, असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या अध्यक्षा माया परदेशी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. लासलगाव परिसरातील महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रतिबद्ध आहे आणि जे जे करता येईल त्यासाठी मदत करण्याची ग्वाही लासलगाव कृउबा समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे. महिलांना कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी होण्याच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात, असे यावेळी जगताप यांनी स्पष्ट केले.