भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे सोमवारी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. दिलीप दोशी यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच बळी घेणाऱ्या नऊ भारतीय क्रिकेटपटूंपैकी दोशी एक होते. कसोटीत ११४ बळी घेतले डावखुरे फिरकी गोलंदाज दिलीप यांनी भारतासाठी एकूण ३३ कसोटी सामने खेळले आणि ११४ विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी सहा वेळा पाच विकेट्स घेतल्या. भारतासाठी खेळलेल्या १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी २२ विकेट्स घेतल्या. दिलीप यांनी सौराष्ट्र आणि बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यांनी इंग्लंडच्या वॉरविकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठीही क्रिकेट खेळले. वयाच्या ३२ व्या वर्षी पदार्पण
दोशी यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले. ८० च्या दशकात त्यांनी शांतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली कारण त्यावेळी भारतीय क्रिकेट ज्या पद्धतीने चालवले जात होते त्यावर ते नाराज होते. त्यांनी ‘स्पिन पंच’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र देखील लिहिले आहे. १९८१ मध्ये मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दिलीप यांनी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
By
mahahunt
24 June 2025