मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू संशयास्पद:अंजली दमानिया यांनी व्यक्त केला संशय; धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांनी धनंजय मुंडे यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, आता या दरम्यान त्यांच्या पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांचे निधन हे नैसर्गिक नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणखी एका वादात सापडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात मनाली घनवट यांच्या नातेवाईकांनीच संशय व्यक्त केला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या बाबत माहिती दिली. या संदर्भात आता ससून रुग्णालयाच्या रिपोर्ट मधून आता या संदर्भात सत्य माहिती समोर येईल, अशी आशा आपण ठेवू शकतो, असे देखील दमानिया यांनी म्हटले आहे. कारण ससूनचे रिपोर्ट किती गंभीर आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या संदर्भात केवळ सत्य समोर येईल एवढी आशाच आपण ठेवू शकतो, असे देखील अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. अंजली दमानिया यांनी केले आरोप या संदर्भात अंजली दमानिया यांनी अतिषय गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.’

  

Share