माणिकराव कोकाटेंना रमी खेळणे भोवले:दत्तात्रय भरणेंकडे सोपवली कृषी खात्याची जबाबदारी, तर कोकाटेंकडे क्रीडा खाते माणिकराव कोकाटेंना रमी खेळणे भोवले:दत्तात्रय भरणेंकडे सोपवली कृषी खात्याची जबाबदारी, तर कोकाटेंकडे क्रीडा खाते

माणिकराव कोकाटेंना रमी खेळणे भोवले:दत्तात्रय भरणेंकडे सोपवली कृषी खात्याची जबाबदारी, तर कोकाटेंकडे क्रीडा खाते

माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळबे भोवले असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु कोकाटे यांचे खाते बदल करण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री होते. परंतु, विधिमंडळ कामकाजात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचे सांगितले होते. आता त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्री पद देण्यात आले असून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडील आधी असलेलेय क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे. दतात्रय भरणे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाची चर्चा सुरू होती. आता त्यांच्याकडील खाते हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माणिकराव कोटाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. रमीला राज्य खेळाचा दर्जा द्या राज्यात शेतकरी संकटात असतानाही कृषिमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळताना दिसले. असं असतानाही त्यांचा राजीनाम न घेता फक्त त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. खाते बदलले ही काही कारवाई आहे का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला. आता रमी खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या अशी खोचक मागणी त्यांनी केली. यापुढे मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना पत्ते घेऊन सभागृहात येण्याची जाहीर परवानगी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *