मराठवाड्यात 4.32 लाख लाडक्याबहिणींचे पैसे ई-केवायसीत अडकले:ऊन पावसात बँकांसमोर सकाळपासून लागतात महिलांच्या रांगा
मराठवाड्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेमध्ये तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते, आधारसोबत लिंक नसल्याने, योजनेचा लाभ त्यांना मिळवण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेआधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींच्याबँकांसमोर उन्हा-पावसात रांगा लागत आहेत. तरदुसरीकडे जिल्हा प्रशासनाने याबाबत बँकांशी समन्वयसाधावा, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयानेदिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपयेत्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यानुसारमहिलांनी नारीदूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्यावेबसाईटवर नोंदणी केली. ऑनलाइन व आॅफलाइनआलेल्या अर्जांची तपासणी होऊन पात्र महिलांच्या बँकखात्यात रक्कम जमा केली जात आहे. मात्र त्यासाठीबँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. मात्र मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खातेआधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात रक्कमजमाच झाली नाही. त्यामुळे आता आधार लिंककरण्यासाठी महिलांची बँकांसमोर गर्दी होऊ लागलीआहे. हिंगोली शहरात स्टेट बँक सुरु होण्यापूर्वीचमहिलांच्या बँकेसमोर रांगा लागतात. महिलांची होणारीगर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलातीलमहिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यातअनेक बँकांमध्ये अशी परिस्थिती कायम आहे. आधार लिंक नसलेल्या महिला जिल्हा संख्या
हिंगोली २५,२९३
संभाजीनगर ८५,२८९
जालना ४१,०७१
बीड ५३,०१७
परभणी ३८,२२४
नांदेड ७०,१४१
लातूर ८६,३५३
धाराशिव ३२,९६५ थेट सवाल प्रवीण ठाकरे, व्यवस्थापक, स्टेट बँक, शाखा हिंगोली
Q ई-केवायसीसाठी वेळ का लागतो ?
A जिल्ह्यात बहुतेक महिला खातेदारांनी मागील सहामहिन्यांपासून बँकेचे व्यवहार केले नाहीत. त्यामुळे त्यांचीबँक खाते ॲक्टिव्ह करून मगच ई केवायसी करावीलागत आहे. त्यासाठी वेळ लागत आहे.
Q ई-केवायसीची प्रक्रिया कशी आहे?
A ई-केवायसीसाठी सुरुवातीला महिला खातेदारांचीकेवायसी करावी लागते, त्यानंतर आधार लिंक केले जाते.तिसऱ्या वेळी ईपीएस झाल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रियापूर्ण होते. बँकेत तीन टेबलांवर ही प्रक्रिया करावी लागते.
Q गर्दी कमी करण्यासाठी काय नियोजन?
A बँकेसमोर महिलांची गर्दी होत आहे त्यामुळे बँकांकडूनदररोज शक्य होतील तेवढ्याच महिला खातेदारांनाबोलवले जाते. उर्वरित महिलांना दुसऱ्या दिवशी येण्याचीसूचना दिली जात आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्णकरण्याचे बँकेचे प्रयत्न आहेत.