शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली. या बैठकीत संजय शिरसाट यांनी लाडपाके व सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरांच्या मागणी बद्दल चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, गेल्या अधिवेशनात एक लक्षवेधी लागली होती. या लक्षवेधी मध्ये लाडपाके समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घरे. हा महत्त्वाचा मुद्दा होता, या संदर्भात अजितदादांनी सांगितले होते की लवकरच बैठक घेतो. ती बैठक आज झाली. या बैठकीला फायनान्सची सर्व अधिकारी मुंबईचे युनियनचे काही अधिकारी, माझ्यासोबत आमदार भातखळकर देखील सोबत होते. आजच्या बैठकीमध्ये लाडपाके समितीची अंमलबजावणी काही महानगरपालिकेत, नगरपालिकेत होत नाही, अशा तक्रारी इतर नेत्यांनी केल्या आहेत. त्यासंदर्भात पुन्हा जीआर काढून स्पष्ट सूचना अजितदादांनी दिल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरांची मागणी पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, महत्त्वाचे म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरे देण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे. 25 वर्षांची त्यात अट आहे, 25 वर्षांची जर त्यांची सर्व्हिस झाली असेल, त्यानंतरच तो लाभार्थी होतो. त्यासंदर्भात सर्वांचे असे मत पडले की कॅबिनेट मध्ये एक प्रस्ताव घेऊन जावा आणि ही अट शिथील कशी करता येईल. कारण सर्वसाधारणपणे 20 वर्ष काम केल्यानंतर चतुस्र श्रेणी कर्मचारी हा निवृत्ती घेत असतो. त्यामुळे त्या लभाचा त्याला फायदा होत नाही. आणि ही जी काही घरे द्यायची आहेत ती मोफत द्यायची आहेत. म्हणून 25 वर्षांची अट 20 वर्षांची करावी असा प्रस्ताव आला आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यावर नोट पूटअप करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत. तसेच कॅबिनेटची मान्यता झाल्यावरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रोबोटिक मशीनसाठी 500 कोटींचा प्रस्ताव ज्या सफाई कर्मचारी महिला हाताने कचरा व घाण उचलतात ते आता बंद झाले पाहिजे, असेही संजय शिरसाट म्हणाले. या ठिकाणी रोबोटिक मशीन 500 कोटी रुपयांचे खरेदी करण्याचे आदेश सुद्धा अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून देण्यात आले आहे. तसेच आम्ही केलेल्या मागणी बद्दल अजित पवारांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचेही शिरसाट म्हणाले.