मराठ्यांशी गद्दारी केली तर चौकात फाशी घेईल:मविआच्या भूमिकेवरुन मनोज जरांगे पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे खुले आव्हान

महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. इमानदारीने आला तर 50 लाख रुपये खर्च करून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजेंद्र राऊतची असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. नसता मी आहे आणि तुम्ही आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुले आव्हान देखील दिले आहे. या मराठ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या घरांने हे मराठी आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे, हे लक्षात असू द्या. अशा शब्दात राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तर ते माझ्याबद्दल काहीही बोलत आहेत. हाच तुमचा सुसंस्कृतपणा आहे का? असा सवाल देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला शिवराय ही शिकवण देतात का? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. इमानदारीने आला तर 50 लाख रुपये खर्च करून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजेंद्र राऊतची असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. नसता मी आहे आणि तुम्ही आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुले आव्हान देखील दिले आहे. या मराठ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या घरांने हे मराठी आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे, हे लक्षात असू द्या. अशा शब्दात राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तर ते माझ्याबद्दल काहीही बोलत आहेत. हाच तुमचा सुसंस्कृतपणा आहे का? असा सवाल देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला शिवराय ही शिकवण देतात का? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share