मनसेचा 19 वा वर्धापन दिन:राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष, चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात कार्यक्रम
पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी राज्यभरातील मनसैनिक दाखल होणार आहेत. दरम्यान मनसेचा 19 वा वर्धापनदिन चिंचवडमध्ये साजरा होणार आहे. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. मनसैनिकांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे मनसेच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. मेळाव्यातून पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी ठाकरे कोणत्या मुद्याला हात घालतील. याकडे कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल आहे. वर्धापन दिनामुळे मनसेने जोरदार तयारी केली असून सर्व शहर मनसेमय झाले आहे. हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत