मोदींनी देशाला गुलाम व जनतेला अफूबाज अंधभक्त केले:भारत हा आज भारत राहिलेला नाही; उद्धव ठाकरे गटाची आगपाखड

जॉर्ज सोरोस हे प्रकरण काढून मोदी व त्यांचे लोक कुणाचा बचाव करीत आहेत? मोदी यांच्या पक्षात देशभरातून ओवाळून टाकलेले लोक गोळा झाले. भाजप हा गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांचा शेवटचा अड्डा बनला आहे. त्या लोकांनी जॉर्ज सोरोसची उठाठेव करावी? देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारभावास योग्य किंमत हवी, सुशिक्षितांना नोकऱ्या हव्यात, महिलांना सुरक्षा हवी. मोदींनी देशाला गुलाम व जनतेला अफूबाज अंधभक्त केले. भारत हा आज भारत राहिलेला नाही. एका बुवा–महाराजाच्या मागे टाळ्या वाजवणाऱ्या अंध समाजाची भव्य टोळी बनला आहे. हे सर्व जॉर्ज सोरोसने केले काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. दैनिक सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ही टीका केली आहे. सामनामधील अग्रलेख देखील वाचा…. जॉर्ज सोरोस कोण व त्याचा भारतातील घडामोडींशी संबंध काय? जॉर्ज सोरोसचा गजर करत भारतीय जनता पक्ष संसद चालू देत नाही असे चित्र निर्माण झाले आहे आणि या गोंधळात पंतप्रधान मोदी यांनी संसदेत हजेरी लावण्याचे सोडाच, पण संसद परिसरातूनही पलायन केले आहे. संसदेत भारतीय जनता पक्षाचे जे लोक गोंधळ घालत आहेत, त्यातील 90 टक्के लोकांना जॉर्ज सोरोस कोण व त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा खिळखिळी होत आहे का, याबाबत ‘ओ’ की ‘ठो’ माहीत नाही, पण संसदेत ते आपली नरडी गरम करून त्यांच्या मालकांना खूश करत आहेत. जॉर्ज सोरोस हा 95 वर्षांचा म्हातारा आहे. तो अब्जोपती आहे. हा म्हातारा भारतासारख्या ‘पॉवरफूल’ (भाजपवाले म्हणतात) देशाला अस्थिर वगैरे करू शकेल? मग तुमचे विश्वगुरू काय कामाचे! या काळात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 84.13 इतका नीचांकी घसरला व जगभरात देशाची बेअब्रू झाली यास काय तो जॉर्ज सोरोस जबाबदार आहे? भारताचा राष्ट्रीय हिंदू-मुस्लिम झालाय ईडी, सीबीआयने भ्रष्टाचारातून जमा केलेली हजार कोटींची संपत्ती शुद्ध करून परत केली हे सोरोसचे कारनामे आहेत का? देशामध्ये प्रत्येक तासाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी संकटात आहे तो काय या जॉर्ज सोरोसमुळे? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होता, आता तो हिंदू-मुस्लिम झालाय. तो बदल काय सोरोसने केला? गेल्या दहा वर्षांत गुजरातने एक फेक राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये फेक कोर्ट, फेक जज, फेक पीएमओ अधिकारी, फेक पोलीस, फेक ईडी, फेक डॉक्टर्स असे एक फेक मॉडेल निर्माण करून देशाला लुटण्याचे काम चालवले, त्यास काय हा 95 वर्षांचा जॉर्ज सोरोस जबाबदार आहे? भारतासारख्या देशात फक्त अदानी या मोदी मित्राचा विकास होतोय. देशाची सर्व सार्वजनिक संपत्ती मोदींनी या अदानीच्या घशात घातली. महाराष्ट्रात फडणवीसांचे ईव्हीएम सरकार स्थापन होताच गौतम अदानी सागर बंगल्यावर पोहोचला व पुढच्या 24 तासांत एक सरकारी आदेश निघाला. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे जकात नाके अदानीच्या ताब्यात देण्यात आले. अदानीला आणखी काय काय मिळणार आहे? कचऱ्याच्या घंटागाडय़ाही अदानीच चालवणार असेल, तर राज्यातील लोकांनी काय करायचे? अदानी वीज वितरणाचे काम करतो व त्याने विजेचे दर भरमसाट वाढवून सामान्यांच्या बजेटची वाट लावली यास काय तो जॉर्ज सोरोस जबाबदार आहे? संसदेत चर्चा व्हायला हवी ती मोदी मित्र अदानीवर, पण भाजपवाले जॉर्ज सोरोसचा गजर करीत आहेत. सोरोस म्हणे भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करीत आहे. देशातील बेरोजगारी हा जॉर्ज सोरोसपेक्षा महत्त्वाचा मुद्दा जागतिक बँकेने मोदींच्या या ढोंगाचा बुरखा फाडला आहे. जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट केले आहे की, मोदी राज्यात देश 1990 पेक्षाही जास्त गरीब झाला आहे. एका गरीब देशाची प्रति व्यक्ती कमाई 576 रुपये असायला हवी, पण भारतात प्रति व्यक्ती कमाई 181 रुपयांपेक्षा कमी आहे. मोदींना फक्त अदानीची चिंता आहे. त्यांच्या राज्यात फक्त अदानीची गरिबी दूर झाली. बाकी शेतकरी आजही शंभू बॉर्डरवर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. जॉर्ज सोरोस हा बहाणा आहे. मोदी व त्यांच्या लोकांना मुख्य समस्येवरचे लक्ष हटवायचे आहे. देशातील बेरोजगारी हा जॉर्ज सोरोसपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण भाजपचे प्रवक्ते आता नवीन माहिती घेऊन आले. जवाहरलाल नेहरूंचे चुलतभाऊ बी. के. नेहरू यांची हंगेरी वंशाची पत्नी पह्री नेहरू यांचे म्हणे जॉर्ज सोरोसशी निकटचे संबंध होते. म्हणजे राहुल गांधींच्या चुलत चुलत चुलत आजीच्या संपर्कात जॉर्ज सोरोस होते. हे म्हणजे सध्या मशिदी व इतर प्रार्थनास्थळांखाली जे खोदकाम चालले आहे, त्यातलाच प्रकार. भाजप हा गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांचा शेवटचा अड्डा जॉर्ज सोरोसचे भारतीय जनता पक्षातील प्रमुख लोकांशी निकटचे संबंध आहेत व जॉर्ज काही गुन्हेगार नाही. त्याने वैध मार्गाने पैसे कमावले व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तो अनेक देशांत लोकशाहीवादी संस्था, शैक्षणिक, सामाजिक संस्थांना दान करीत असतो. भविष्यात यात मोदींचे नाव आले तरी आश्चर्य वाटायला नको. जॉर्ज सोरोस हे प्रकरण काढून मोदी व त्यांचे लोक कुणाचा बचाव करीत आहेत? मोदी यांच्या पक्षात देशभरातून ओवाळून टाकलेले लोक गोळा झाले. भाजप हा गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांचा शेवटचा अड्डा बनला आहे. त्या लोकांनी जॉर्ज सोरोसची उठाठेव करावी? आज देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारभावास योग्य किंमत हवी आहे, सुशिक्षितांना नोकऱ्या हव्यात, महिलांना सुरक्षा हवी. मोदी 85 कोटी लोकांना फुकट धान्य देत असल्याचा डंका पिटतात. ही भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण आहे. अशी भीक ते आणखी किती काळ देणार? मोदींनी देशाला गुलाम व जनतेला अफूबाज अंधभक्त केले. भारत हा आज भारत राहिलेला नाही. एका बुवा-महाराजाच्या मागे टाळ्या वाजवणाऱ्या अंध समाजाची भव्य टोळी बनला आहे. हे सर्व जॉर्ज सोरोसने केले काय?

  

Share