भारतातील 85% हून जास्त जिल्हे पूर, दुष्काळाच्या संकटात- अहवाल:पूरग्रस्त राहणाऱ्या देशातील 45% जिल्ह्यांत दुष्काळाचा धोका

भारतातील 85% पेक्षा जास्त जिल्हे पूर, दुष्काळ व चक्रीवादळ यांसारख्या कठोर हवामान बदलांच्या घटनांनी (एक्स्ट्रीम वेदर) प्रभावित झाले आहेत. आयपीई ग्लोबल आणि ईएसआरआय इंडियाने केलेल्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की देशातील 45% जिल्ह्यांमध्ये ‘क्लायमेट स्वॅपिंग’ची परिस्थिती दिसून येत आहे. म्हणजेच जे जिल्हे परंपरेने पूरप्रवण होते पण आता त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच दुष्काळी भागात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. अभ्यासात 1973 ते 2023 या 50 वर्षांच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल हवामानाची यादी तयार केली. गेल्या दशकात एक्स्ट्रीम वेदरच्या घटनांमध्ये 5 पट वाढ झाली आहे आणि अति पूर घटनांमध्ये 4 पट वाढ झाली. पूर्वेतील जिल्हे पुराच्या घटनांसाठी अधिक असुरक्षित आहेत. त्यापाठोपाठ देशाच्या ईशान्य व दक्षिणेकडील भागांचा क्रमांक लागतो. जग : २०२४ सर्वात उष्ण वर्ष होण्याची शक्यता 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होण्याच्या मार्गावर आहे. युरोपियन क्लायमेट एजन्सी कोपर्निकसच्या मते, जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जागतिक तापमान 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.70 अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले. आकडेवारी दर्शवते की गेल्या 14 महिन्यांपैकी 13 महिन्यांत, जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, जे 100 वर्षांपूर्वीपेक्षा जास्त आहे. येत्या काही महिन्यांत तापमानात किमान 0.30 अंश सेल्सिअसने घट न झाल्यास 2024 हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष ठरेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोपर्निकसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांच्या मते, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी न झाल्यास यंदाच्या तापमानाशी संबंधित आपत्ती आणखी गंभीर होऊ शकतात. दिल्ली : मुसळधार पावसामुळे पाणी घुसले, ट्रॅफिक जाम राजधानी दिल्लीत शुक्रवारी दिवसाची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. बपरौला क्षेत्र, नजफगड रोडच्या छायाचित्रांतून पाण्याची गंभीर दिसते. अरबिंदो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहने संथ गतीने पुढे सरकत असल्याचे दिसले. राजस्थान: भिलवाड्यात मुसळधार, बिसलपूर धरणाचे २ गेट उघडले राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शेजारच्या टोंक जिल्ह्यात बिसलपूर धरणाचे २ गेट शुक्रवारी पुरेशा पाणीसाठ्यामुळे उघडली. जल संसाधनमंत्री सुरेश रावत यांनी गेट उघडण्याआधी अधिकाऱ्यांसोबत विधिवत पूजा केली. रावत म्हणाले, धरणाचे २ दरवाजे उघडले आहेत. विजयवाडा :२० वर्षांत भीषण पूर, ३ लाख लोकांना फटका आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे विजयवाडा २० वर्षांतील सर्वात भीषण पुराचा सामना करत आहे. विजयवाड्यात बुडामेरू नदीमुळे अर्ध्या विजयवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे ३ लाख लोक अडकले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment