केज तालुक्यातील सरपंचाचे अपहरण करून खून:संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन, आरोपींना अटक करण्याची मागणी

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक संतप्त होत अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावत रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. संतप्त नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कामामुळे त्यांची तालुक्यात चांगली ओळख आहे तसेच त्यांना येथील नागरिकांचा देखील पाठिंबा आहे. संतोष देशमुख यांनी मस्साजोग ग्रामपंचयातीला अनेक पुरसकार मिळवून दिले आहेत. तसेच त्यांची लोकांमधील प्रतिमा देखील चांगली होती. यामुळे येथील नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. सरपंच देशमुख यांचा मृतदेह ‎केज येथील उपजिल्हा ‎रुग्णालयात आणल्यानंतर ‎नातेवाईकांसह ग्रामस्थ व‎ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.‎ मारेकऱ्यांना अटक केल्यावरच‎ आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, ‎असा आक्रमक पावित्रा‎ नातेवाईकांनी घेतला होता. ‎त्यामुळे रूग्णालयात बंदोबस्त‎ तैनात केला होता.‎ रस्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक चेतन तिडके आणि अतिरिक्त पोळस अधीक्षक दाखल झाले असून संतप्त नगरिकांची व नातेवाईकांची समजूत काढली जात आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच‎सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी ३ वाजता,‎केजहून (एम. एच. 44 बी. 3032) कारने गावाकडे‎निघाले होते. गावातील शिवराज देशमुख हा त्यांची‎कार चालवत होता. डोणगाव फाट्याच्या पुढील‎टोलनाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या‎लाइनमधून कार जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या‎मधोमध हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ (एम. एच. 44 ‎झेड. 9333) आडवी लावली. स्कॉर्पिओतून‎उतरलेल्या सहा हल्लेखोरांपैकी एकाने कारच्या‎दरवाज्याची काच दगडाने फोडली. नंतर कारच्या‎डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांना‎खाली ओढून काठीने मारहाण केली. त्यांना‎बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून अपहरण केले. ही‎जीप सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) यांची‎असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुदर्शन घुले‎व इतर 5 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल होता.

  

Share