माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत ठाकरेंनी जनतेला वाऱ्यावर सोडले:माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारच्या काळातील कामांची तुलना शेतकऱ्यांनी करावी. स्वातंत्र्यानंतर महायुती सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, शेती पंपाची वीज बिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, माझी लाडकी बहीण योजना यासह शेतकरी सन्मान योजना आदी योजना राबवल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत, जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याची टीका त्यांनी केली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आ.मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शोभा अकोलकर,आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी आदी उपस्थित होते. शेवगावात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभा घेतली.

  

Share