नागपूर जिल्हा पेटवून टाकू, चिथावणीखोर भाषेत दिली धमकी:सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

नागपूर जिल्हा पेटवून टाकू, चिथावणीखोर भाषेत दिली धमकी:सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

आधीच भाजपच्या रडारवर असलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी एका दलित महिला सरंपचाबाबत अभद्र बोलणाऱ्या आपल्या सरपंचाची बाजू घेऊन नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषा केल्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपने केदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्याने केदार आधीच अडचणीत आले आहेत. त्यांना पाच वर्षे कुठलीच निवडणूक लढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मोठे लाभल्याने आता त्यांनी नागपूर ग्रामीणमधील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात लक्ष घालणे सुरू केले. भाजपचे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना पराभूत करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. केदारांना ‘दंबग’ नेता म्हणून ओखळले जाते. आपल्या कार्यकर्त्यासाठी ते राजकरण आणि फायद्या-तोट्याचा विचार करीत नाही. भाजप आता हिंगण्यामध्ये घडलेले प्रकार कितपत ताणून धरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते यांच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते यांच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी यावेळी केदारांनी दिली. त्यामुळे मोठा संताप निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम व नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केली आहे. सरपंच योगेश सातपुते यांच्याविरोधात दलित महिला उपसरपंचाने बुटीबोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. असे असताना गैरवर्तवणूक करणाऱ्या या सरपंचाच्या कृत्याचे जनतेपुढे जाहीर सभेत सुनील केदार यांनी समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर योगेश सातपुतेच्या केसाला जरी धक्का लागला, तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू’ अशी चिथावणीखोर भाषेत धमकी दिली आहे. एकूणच हा सर्व प्रकार दलितावरील अत्याचाराच्या घटनांचे समर्थन करणारा आणि आरोपींचे संरक्षण करणारा आहे. जातीजाती मध्ये कलह निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा सुनील केदार यांचा कट असल्याचा आरोप ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

​आधीच भाजपच्या रडारवर असलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी एका दलित महिला सरंपचाबाबत अभद्र बोलणाऱ्या आपल्या सरपंचाची बाजू घेऊन नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषा केल्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपने केदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्याने केदार आधीच अडचणीत आले आहेत. त्यांना पाच वर्षे कुठलीच निवडणूक लढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मोठे लाभल्याने आता त्यांनी नागपूर ग्रामीणमधील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात लक्ष घालणे सुरू केले. भाजपचे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना पराभूत करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. केदारांना ‘दंबग’ नेता म्हणून ओखळले जाते. आपल्या कार्यकर्त्यासाठी ते राजकरण आणि फायद्या-तोट्याचा विचार करीत नाही. भाजप आता हिंगण्यामध्ये घडलेले प्रकार कितपत ताणून धरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते यांच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते यांच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी यावेळी केदारांनी दिली. त्यामुळे मोठा संताप निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम व नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केली आहे. सरपंच योगेश सातपुते यांच्याविरोधात दलित महिला उपसरपंचाने बुटीबोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. असे असताना गैरवर्तवणूक करणाऱ्या या सरपंचाच्या कृत्याचे जनतेपुढे जाहीर सभेत सुनील केदार यांनी समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर योगेश सातपुतेच्या केसाला जरी धक्का लागला, तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू’ अशी चिथावणीखोर भाषेत धमकी दिली आहे. एकूणच हा सर्व प्रकार दलितावरील अत्याचाराच्या घटनांचे समर्थन करणारा आणि आरोपींचे संरक्षण करणारा आहे. जातीजाती मध्ये कलह निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा सुनील केदार यांचा कट असल्याचा आरोप ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment