नाना पटोलेंना शपथविधीचे निमंत्रणच नव्हते:म्हणाले, असते तर गेलो असतो; चंद्रकात पाटलांकडून मात्र, निमंत्रणाचा दावा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशभरातील नेते उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राच्या विरोधीपक्षाचे नेते या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यामुळे यावर चर्चा रंगली आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला आमंत्रण नसल्याचा दावा केला आहे. तर त्यांना आमंत्रण दिल्याचा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे आमंत्रण असूनही शपथविधीला न आलेले नेते दुर्देवी असल्याची टीका शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘निरोप कोणाला दिला याची आम्हाला माहिती नाही. निरोप दिला असता तर आम्ही नक्कीच शपथविधीला गेलो असतो. देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे मी काल ऐकत होतो. त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे साहेबांना फोन केल्याचे ते सांगत होते. मात्र आम्हाला निरोप दिलेला नाही. त्यांनी मला बोलावलेच नाही म्हणून तो विषय आमच्यासाठी लागू होत नाही. मात्र ते आमचे मित्र असून आमचे मित्र मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच मला विश्वास आहे की, माझा मित्र महाराष्ट्रासाठी चांगले काम करेल.’ चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर मुळात हा कार्यक्रम एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये नव्हता. नाना पटोले हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचा -ज्यांचा सहभाग आहे. त्या सर्वांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन केला आणि निमंत्रण दिले होते. नाना पटोले यांना फोन केला असेल मात्र लागला नसेल, असे मला वाटते. त्यांना निमंत्रण होते, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते नेते दुर्वेवी – संजय शिरसाट महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनाधाराप्रमाणे हे सरकार पाच वर्षे मजबुतीने जालणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. याची ग्वाही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी तसेच सर्व नेत्यांनी दिली आहे. ज्या लोकांना आमंत्रण देवूनही ते शपथविधीला आले नाहीत, ते लोक दुर्दैवी असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

  

Share