नांदेडमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण VIDEO:दोन तरुणांनी बाईकवर उचलून नेले, पोलिसांनी पाहताच रस्त्यावर फेकले; एकाला अटक नांदेडमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण VIDEO:दोन तरुणांनी बाईकवर उचलून नेले, पोलिसांनी पाहताच रस्त्यावर फेकले; एकाला अटक

नांदेडमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण VIDEO:दोन तरुणांनी बाईकवर उचलून नेले, पोलिसांनी पाहताच रस्त्यावर फेकले; एकाला अटक

नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी दिवसाढवळ्या एका मुलीचे दुचाकीवर टाकून अपहरण केले. मात्र, पोलिसांनी पाहताच तरुणांनी त्या तरुणीला रस्त्यावरच फेकून पळ काढला. नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अपहरणाचा हा प्रयत्न दिवसाढवळ्या झाला. त्यातील एक पुरूष मुलीला गळ्याला घट्ट धरून तिला ओढत नेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर ती तरुणी देखील त्यांना प्रतिकार करत ओरडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नांदेड पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नांदेड पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मुलीची सुखरूप सुटका करण्यात आल्याची पुष्टी केली. तरुणीला सुखरूप वाचवण्यात आले आहे. घटनेवेळी पोलिस अधिकारी परिसरात उपस्थित होते आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे अविनाश कुमार यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, अपहरण करणारा आरोपी आणि अपहृत मुलगी यांची जुनी ओळख होती. अपहरणापूर्वी त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली होती, आणि त्यानंतर आरोपी तिला सोबत घेऊन जात होता, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांनी पाहताच तरुणीला रस्त्यात फेकले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणीला रस्त्याच्या मधोमध फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलीस दुचाकीवरून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत आणि तरुणीच्या जबाबानुसार या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रस्त्यावरील लोक घटनेचे चित्रीकरण करताना दिसत आहेत, तर एक व्यक्ती “चला, मुलीला वाचवूया” असे म्हणताना ऐकू येत आहे. एका आरोपीने तरुणीला उचलून बाईकवर बसवल्याचे दिसते, तर त्याचा साथीदार दुसऱ्या दुचाकीवरून वेगाने पळताना दिसतो. भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या धक्कादायक प्रकारामुळे नांदेड शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरदिवसा, गर्दीच्या ठिकाणी एका युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न होणे ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी केली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… मालाडमध्ये ट्युशन शिक्षिकेचा अमानुष प्रकार:खराब हस्ताक्षरामुळे 8 वर्षाच्या चिमुकल्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके, गुन्हा दाखल मालाड पूर्व भागात एका खासगी ट्युशन क्लासमध्ये 8 वर्षाच्या मुलावर शिक्षिकेने अमानुषपणे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हस्ताक्षर नीट नाही म्हणून या लहान मुलाच्या हातावर चक्क मेणबत्तीचे चटके देण्यात आले. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सविस्तर वाचा…

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *