नाशिकमध्ये महात्मा फुले जयंतीची तयारी पूर्ण:आकर्षक रोषणाई व फुलांनी केली लक्षवेधी सजावट, पाहा फोटो

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्रच जोरदार तयारी करण्यात आली आहे. नाशिक येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांची सजावट तसेच स्मारकाच्या मागच्या बाजूस असलेल्या उड्डाणपुलावरही विद्युत रोषणाईच्या माळा लावण्यात आल्या आहेत. एकंदरीतच नाशिकच्या सौंदर्यात स्मारकांच्या सजावटीने आणखी भर घातली असल्याचे दिसत आहे. नाशिक येथील महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे फोटो

  

Share