भारतीय रेल्वेच्या एसी आणि नॉन-एसी श्रेणीतील सर्व एक्स्प्रेस, मेल आणि सेकंड क्लासच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. रेल्वेचे नवीन दर १ जुलै २०२५ पासून लागू होण्याची शक्यता आहे. ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दरवाढीचा फटका बसणार नाही. मात्र, ५०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटरनुसार रेल्वे भाड्यात वाढ अनुभवायला मिळेल. विना एसी डब्यांमध्ये एका किलोमीटर मागे १ पैशाची वाढ तर एसी डब्यांमध्ये एका किलोमीटरमागे २ पैशांची वाढ होऊ शकते. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने तयार केला असून तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच नवीन दर लागू केले जातील. यापूर्वी, रेल्वेने जानेवारी २०२० मध्ये भाडेवाढ केली होती. त्यावेळी विविध श्रेणींसाठी प्रति किलोमीटर १ ते ४ पैसे दरात वाढ झाली होती. १ जुलैपासून प्रस्तावित असलेल्या या वाढीमुळे रेल्वेला वार्षिक ८०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. पास व्यवस्था.. राजमार्ग ॲपवर दिसेल फास्टॅग पासचा मोफत रस्ता नवी दिल्ली | फास्टॅगच्या वार्षिक पास योजनेअंतर्गत खासगी वाहनचालकांच्या सोयीसाठी एनएचएआयने ‘राजमार्ग’ हे ॲप विकसित केले आहे. हे ॲप राष्ट्रीय महमार्गावर वार्षिक पास लागू असलेला मार्ग चालकांना मार्ग दाखवेल, यामुळे चालकांना राज्य महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवर अधिक टोल भरणे टाळता येईल. हे ॲप १५ जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. फास्टॅगचा वार्षिक पास १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. श्रेणी अंतर भाडे वाढ साधारण सेकंड क्लास 500 किमी पर्यंत कोणतीही वाढ नाही
साधारण सेकंड क्लास 500 किमी+ अर्धा पैसा प्रति किमी
मेल/एक्स्प्रेस (विना-एसी) — 1 पैसा प्रति किमी
एसी क्लास (सर्व गाड्या) — 2 पैसा प्रति किमी
मासिक सीझन तिकीट — कोणतीही वाढ नाही
उपनगरीय गाड्या (लोकल) — कोणतीही वाढ नाही


By
mahahunt
25 June 2025