नवाजुद्दीनचा चित्रपट पाहून अल्पवयीन भावानेच केली बहिणीची हत्या:6 वर्षांची मुलगी कुटुंबाची लाडकी असल्याने होता नाराज

महाराष्ट्रातील पालघर येथील नालासोपारा भागातून पोलिसांनी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर त्याच्या 6 वर्षांच्या चुलत बहिणीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह जवळच्या टेकडीवर आढळला. प्रथम तीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर डोके दगडाने ठेचण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, हत्येपूर्वी, अल्पवयीन मुलाने रमन राघव 2.0 हा हिंदी चित्रपट पाहिला होता, ज्यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एका सिरियल किलर असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य चुलत बहिणीवर जास्त प्रेम करतात यावरुन अल्पवयीन मुलगा नाराज होता. अल्पवयीन मुलाला वाटले की, त्याच्याकडे कमी लक्ष दिले जात आहे. टेकडीवर सापडला मुलीचा मृतदेह
पालघर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी संध्याकाळी मुलगी अचानक घरातून गायब झाली. खूप शोध घेतल्यानंतरही कोणतीच माहिती मिळाली नाही. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी मुलीच्या घराजवळ बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये तो अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जाताना दिसला. नंतर त्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नंतर मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र वनकुटे यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिस पथक श्रीराम नगर टेकडीवर पोहोचले. रविवारी पहाटे 4.40 वाजता मुलीचा मृतदेह सापडला.

  

Share