आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर केलेल्या आरोप संदर्भातले पुरावे शोधले जाणार आहेत. या संदर्भातली माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये केलेल्या आचारसंहिता भंगाची देखील माहिती देण्यात आली. यासंदर्भात देखील काँग्रेस लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद, लोकसभा सदस्यत्व रद्द करा – उच्च न्यायालयात याचिका नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद आणि लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मोदींनी 2020 मध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने देखील अंशतः सदरील प्रकरण मान्य केले असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….