निवडणूक आयोगाकडून उत्तरे आली नाहीत:आयोगाला पाठवले होते पत्र, प्रकाश आंबेडकरांची माहिती

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते, असे एक पत्र त्यांनी पाठवले होते. यावर अद्याप कुठलेही उत्तर आले नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे खरेच संध्याकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झाले का असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ईव्हीएमच्या संदर्भातले आंदोलनाला आम्ही सुरुवात केली आहे. मध्यंतरी आम्ही कॉंग्रेस पक्षाला आवाहन केले होते की त्यांनी या ईव्हीएमच्या विरोधाच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी बोलवावे. परंतु, कॉंग्रेसकडून अजून कुठलाही प्रतिसाद नाही. आम्ही लवकरच सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएमच्या संदर्भातली एक बैठक बोलावली जाणार आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन कमिशनचे प्रतिनिधि चोकलिंगम यांनी अद्यापही आमच्या पत्राला उत्तर दिलेले नाही. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 20 तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि 23 तारखेला सर्व मतदान ज्यावेळेस मोजण्यात आले त्याची आकडेवारी देण्यात यावी अशी आम्ही मागणी केली आहे. दुसरी मागणी म्हणजे 20 तारखेला जे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळी 6 नंतर 75 लख मतदान झाले असे सांगण्यात आले आहे. यावर आम्ही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सायंकाळी 6 नंतर किती मतदान झाले याची आकडेवारी द्या. संध्याकाळी 6 वाजता जे रांगेत उभे होते या सगळ्यांना आपण स्लिप वाटली असेल तर पोलिंग बूथ नुसार किती स्लिप वाटल्या त्याची माहिती द्या. आपण कुठल्या अधिकारामार्फत ती स्लिप वाटली आहे 6 नंतरची ती जि वाटण्यात आली आहे त्या स्लिपचे व्हिडिओ क्लिप आम्हाला द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. पुढे आंबेडकर म्हणाले, यातील काही प्रश्नांची काही उत्तरे आली आहेत. नांदेड दक्षिणचे उत्तर आले आहे, औरंगाबाद पश्चिमचे उत्तर आले आहे. परंडा विधानसभा येथील काही उत्तर आले आहेत. यात जे उत्तर मिळाले आहे त्यात स्लिप किती वाटल्या गेले आणि कोणी वाटले तसेच त्याचे व्हिडिओ किती यावर कोणीही नीट उत्तर देऊ शकले नाही. कायदा असा म्हणतो की 5 वाजून 59 मिनिटे झाली की इलेक्शन प्रोसेस थांबवावी लागते, दरवाजे बंद केले जातात, जे आत आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि ज्याच्याकडे टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार आहे. पीओ जो असतो त्याने ही सगळी कारवाई करावी लागते आणि या सगळ्याचा रेकॉर्ड त्याला मेंटेन करावा लागतो आणि हेच आम्ही त्यांना मागत आहोत. याला उत्तर असे येत आहे की हा डेटा डेटा येत नाही. त्यामुळे प्रश्न पडतो की खरंच 75 लख लोकांनी मतदान केले का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

  

Share