माझे स्वतःचे काही नाही, राष्ट्रासाठी आमचे आयुष्य समर्पित:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रेरित

हिवाळी अधिवेशनादरम्यान आज महायुतीच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली. यावेळी आमदारांनी संघाचे आद्य संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन संघाचे प्रचारक यांनी बौद्धिक मार्गदर्शनही केले. या स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “संघाने नेहमी राष्ट्रासाठी काम केले आहे. त्याचा लाभ या निवडणुकीत महायुतीला झाला. हिंदुत्त्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ आहे. बाळासाहेब आणि संघाचे विचार सारखे होते. आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असं जाणवत नाही.” तसेच पुढे भाष्य करत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ” आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणानुसार आम्ही डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम” माझं स्वतःचं काही नाही, राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित आहे.’ ही त्यांची विचारसरणी आहे. सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमिका गौरवास्पद वाटले.

डॅा.हेडगेवार यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये लोकांना एकत्र करून राष्ट्रिय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली.अनेक वर्षांपासून हे जे काम झालेलं आहे त्या कामांमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना संघ कशाप्रकारे गुणवत्ता वाढवण्याची दिशा देतो याचे उदाहरण या ठिकाणी मिळाले. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक पदाधिकारी आज इथे उपस्थित होते.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण सांगितलं होतं. ती ही अशाच प्रकारची सामाजिक भूमिका सांगितलेली आहे आणि त्यामुळे इथे आल्यावर प्रेरित आणि उत्साही वाटलं.” असंही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, चित्रा वाघ, जयकुमार रावल (यवतमाळ), श्रीकांत भारतीय, शिवेंद्र राजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, संजय उपाध्याय, उदय सामंत, गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, राम शिंदे, निलेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक, मंगलप्रभात लोढा,संजय शिरसाट, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्वेता महाले, नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या इतर आमदारांनी स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.

  

Share