हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे:देशसेवेची भावना आणि तिरंग्याचा अभिमान, ‘दिव्य मराठी’च्या अभियानात संभाजीनगरकरांच्या उत्साहाला उधाण

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो
सर्वत्र उत्साह, आनंद आणि देशभक्तीमय वातावरण, हाती झेंडा घेऊन बागडणारी लहान मुले, आणिआपल्या पहाडी जयघोषांनी देशप्रेमाच्या घोषणा देणारी तरुणाई. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात देशाप्रति प्रेम आणि अभिमान झळकत होता. या भारावलेल्या वातावरणात कोणी बनून आली होती सावित्रिमाई तर कोणी माँसाहेब जिजाऊ. अमृतमहोत्सवी ‎‎प्रजासत्ताकदिनी दैनिक दिव्य‎मराठीतर्फे आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकर सहभागी झाले. आणि आपल्या मनातल्या भावना त्यांनी दिव्य मराठीच्या वॉलवर व्यक्त केल्या. दरवर्षी 26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. यंदा आपण 76 वा गणराज्य दिन साजरा केला. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताचे संविधान स्वीकारले गेले. म्हणूनच या दिवशी संपूर्ण देशभर गणराज्य दिन साजरा केला जातो. 26 जानेवारीच्या दिवशी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य आणि अधिकाराची आठवण करून दिली जाते. आजच्या दिवशी आपल्या देशाला संविधान प्राप्त झाले, ज्याने देशाला स्वतंत्र कायदे आणि अधिकार दिले. 26 जानेवारी अमृतमहोत्सवी ‎‎प्रजासत्ताकदिनी दैनिक दिव्य ‎मराठीतर्फे शहरातील हजारो नागरिकांनी ‎‎देशाविषयी त्यांच्या भावना संदेशरूपात ‎‎व्यक्त केल्या. हा उपक्रम ‎रविवारी (दि. 26) सकाळी 7 ते ‎‎दुपारी 1 या वेळात क्रांती चौकात व ‎‎शहरातील 6 बाजारपेठांच्या मुख्य‎ ठिकाणी हा आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. याठिकाणी उभारण्यात आलेल्या संदेश‎ वॉलवर छत्रपती संभाजीनगरवासियांनी देशाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. हे आहेत उपक्रमाचे प्रायोजक‎ इन्स्पिरा रिॲल्टी, सिद्धी डेव्हलपर्स, विजेता ग्रुप,‎मनजित प्राइड ग्रुप, नभराज ग्रुप, माउली‎कन्स्ट्रक्शन, बहुरे ग्रुप, स्मिता हॉलिडेज, व्ही.एम.‎स्टार सिक्युरिटी फोर्स प्रा. लि., निट्टिटो एक्झिम‎इंडिया लि., डॉ. ए. ए. कादरीज मानसिक आरोग्य‎ केंद्र, सिमर समर्थ आयव्हीएफ. कॅननोट प्लेस. टी.व्ही. सेंटर, सूतगिरणी चौक, निराला बाझार आणि क्रांती चौक याठिकाणी दिव्य मराठीने मोठ्या वॉल उभारल्या होत्या. याशिवाय वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा करुन आलेल्या कित्येक मुली आणि महिलांनी सावित्री माईला नमन केले. आज ही संधी आम्हाला सावित्रीबाईंमुळेच मिळाल्याचेही त्या म्हणाल्या. जर सावित्रिबाई नसत्या तर आम्हीही आज याठिकाणी नसतो. आमच्या सावित्रीआईने शेण, दगड-विटा खाल्ल्या आणि आमचा मार्ग सुकर केला. आजही आम्हाला कठिण परिस्थितीत लढण्याच बळ सावित्रिमाईच देते. असे म्हणत महिलांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 2025 साली आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकत्र राहून देशाचा विकास कसा होईल यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळे भारत देशाला विविधतेतील एकदा असणार देश संबोधिले जाते. दिल्लीतील भव्य सोहळ्यांनी लक्ष वेधले असताना, देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रीय ध्वज उभारण्यापासून ते शाळा आणि समुदायांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत, भारतीय हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. भारत माता तेरा आँचल, हरा-भरा धानी-धानी। मीठा-मीठा चम्-चम करता, तेरी नदियों का पानी।

  

Share