ओबीसींच्या हक्काचे आरक्षण घेणारे ‘टगे’:लक्ष्मण हाके यांचा मराठा समाज अन् नेत्यांवर घणाघात; म्हणाले – मनोज जरांगे लबाड कोल्हा ओबीसींच्या हक्काचे आरक्षण घेणारे ‘टगे’:लक्ष्मण हाके यांचा मराठा समाज अन् नेत्यांवर घणाघात; म्हणाले – मनोज जरांगे लबाड कोल्हा

ओबीसींच्या हक्काचे आरक्षण घेणारे ‘टगे’:लक्ष्मण हाके यांचा मराठा समाज अन् नेत्यांवर घणाघात; म्हणाले – मनोज जरांगे लबाड कोल्हा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला आहे. या प्रकरणी त्यांनी जरांगे यांचा उल्लेख लबाड कोल्हा, तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाज व त्यांच्या नेत्यांचा उल्लेख ‘टगे’ म्हणून केला आहे. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी ते येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे राज्याचे राजकारण तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे लोक आता ओबीसींचे आरक्षण घेऊन निवडणुकीला उभे राहणार आहेत. फुले – शाहू – आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी गावगाड्यातील प्रत्येक माणसाला मानसन्मान मिळवून देण्यासाठी आरक्षण दिले. पण सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण संपवण्याचा घाट घालत आहेत. ओबीसी सर्वांना धडा शिकवतील मनोज जरांगे हा लबाड कोल्हा आहे. त्यामुळे ओबीसी जनतेने ताठ मानेने पुढे आले पाहिजे. आम्ही या प्रकरणी राज्यात संघर्ष यात्रा काढत आहोत. जरांगे यांनी कितीही लोकं गोळा करावी. ओबीसी त्याकडे शांतपणे पाहत आहेत. सर्वच ओबीसींना त्यांचे राजकारण समजत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना माझे सांगणे आहे की, ओबीसी शांत आहेत म्हणून त्यांचा आवाज दिसत नाही असे कुणीही समजू नये. ओबीसी सर्वांना धडा शिकवतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. शरद पवारांची मंडल यात्रा डुप्लिकेट शरद पवार आपल्या काळ्या कृत्याची उपरती म्हणून नागपूरमध्ये जाऊन मंडल यात्रा काढत आहेत. त्यांनी ही डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या भानगडीत पडू नये. सत्ताधाऱ्यांनीही ओबीसींच्या व्यासपीठावर मोठमोठ्या गप्पा मारण्यापेक्षा ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा आम्ही सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. सद्यस्थितीत गावोगावी सर्वांनी ओबीसींचे दाखले काढल्यामुळे हे आरक्षण आता संपल्यात जमा आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. बबनराव तायवाडेंचीही जरांगेंवर टीका दुसरीकडे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी विरुद्ध मराठा दंगलीसंबंधी केलेले विधान फेटाळून लावले आहे. गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन बंददाराआड नव्हे तर खुल्या व्यासपीठावर झाले. त्यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. सर्वांना हे अधिवेशन ऑनलाईन पाहता आले. त्यामुळे त्यात कट रचण्यात येण्याचा प्रश्नच नाही. ओबीसींचे 100 आमदार निवडून आलेत. त्यामुळे ओबीसींना सरकारमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळाले. जरांगे यांच्या मराठा विरुद्ध दंगल होण्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी जरांगेंना खुल्या चर्चेचेही आव्हान दिले. हे ही वाचा… देवेंद्र फडणवीस हे EC च्या दरोड्यातील लाभार्थी:संजय राऊत यांचा घणाघात; निवडणूक आयोग हा दुतोंडी गांडूळ असल्याचाही केला आरोप मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील एक लाभार्थी असल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? ते आयोगाच्या दरोड्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ते आयोगाची बाजू घेत आहेत, असे त म्हणालेत. वाचा सविस्तर

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *