ओला, उबेरविरुद्ध चाैकशी, भाड्यात हेराफेरीचा आरोप:आयफोन वापरकर्त्यांशी भेदभावाचे प्रकरण
ओला आणि उबेर यांसारख्या कंपन्यांकडून अँड्राॅइड फोन वापरकर्त्यांच्या तुलनेत आयफोन वापरकर्त्यांकडून जादा प्रवासी भाडे वसूल करत असल्याचे समोर आले आहे. ही बाब गांभिर्याने घेतली असल्याचे बुधवारी सरकारने संसदेत स्पष्ट केले. तसेच सत्य शोधण्यासाठी चाैकशी सुरू केली असल्याचेही सांगितले. अँड्राॅइड आणि आयफोन वापरकर्त्यांशी प्रवासी दर आकारण्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ओला आणि उबेर यांनी डिव्हाईस आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर वेगवेगळे प्रवासी दर आकारले जात असल्याची बाब फेटाळली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हे आरोप १० फेब्रुवारी रोजी आलेल्या एका पत्राला उत्तर देताना केला होता. ग्राहक संरक्षण नियमानुसार मनमानी प्रवासी भाडे आकारता येत नाही… जानेवारीमध्ये केलेल्या एका सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या प्रवाशांनी ‘डार्क पॅटर्न्स’चा इशारा दिला आहे. यामध्ये गैरप्रकारे असमान पध्दतीने प्रवासी भाडे जबरदस्तीने वसूल करणे, छुप्या पध्दतीने शुल्क आकारणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. जोशी यांनी उत्तरात म्हटले की, ग्राहक संरक्षण (इ-काॅमर्स) नियम २०२० नुसार यांसारख्या कंपन्यांना प्रवाशांकड मनमानी पध्दतीने प्रवासी भाडे आकारता येत नाही.