वृद्धांना घरात रुग्णालय, ईव्हीत मोफत प्रवास, डे केअर मिळेल:कोचीनंतर तिरुवनंतपुरम बनेल देशाची दुसरी एल्डर फ्रेंडली सिटी

कोचीनंतर आता केरळची राजधानी तिरुवनंतपुरम देशातील दुसरे एल्डर फ्रेंडली शहर बनत आहे. यासाठी महापालिकेने विशेष धोरण आखले आहे. शहरात राहणाऱ्या सर्व वृद्धांची त्यांच्या घरातच वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि गरज पडल्यास रुग्णालयातील सर्व सुविधा घरीच दिल्या जातील. ७० वर्षांवरील सर्व वृद्ध इलेक्ट्रिक बसेसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. ही योजना अंतिम टप्प्यात आहे. १२ सदस्यीय सीनियर सिटिझन काैन्सिची यासाठी स्थापना करण्यात आली. याच्या अध्यक्ष महापौर आर्या राजेंद्रन आहेत. त्या म्हणाल्या, आम्ही शहरात राहणाऱ्या वृद्धांचे सर्वेक्षण करणार आहोत. त्यानंतर घरांमध्ये एकटे राहणाऱ्या वृद्धांची यादी तयार केली जाईल. दुसरी यादी अशा वृद्धांची असेल, जे मुले कामावर गेल्यानंतर सकाळ ते सायंकाळपर्यंत एकटे राहतात. आम्ही अशा वृद्धांना समाजाशी जोडण्यासाठी वेगळ्याने योजना बनवू. पुढाकार… दरवर्षी आयोजित होणार वयोजन फेस्टिव्हल शहरात दरवर्षी वयोजन फेस्ट आयोजित करण्याची योजना आहे. २०२४ मध्ये पहिला वयोजन फेस्ट आयोजित करण्यात आला. यात वृद्धांसाठी राजकारण, साहित्य, सिनेमा, खेळ अशा आठ वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश होता. ओमना सांगतात की, मुलीच्या लग्नानंतर मी एकटी पडले होते. वयोजनोत्सवात सहभागी झाले. तिथे जाऊन वाटले की मी एकटी नाही. अनुभव… योजनांच्या निर्मितीत वृद्धांनाही सहभागी करणार तिरुवनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन म्हणाल्या, आम्ही ठरवले आहे की, शहराच्या विकासासाठी तयार होणाऱ्या योजनांच्या निर्मिती आणि अंमलबजावणीत वृद्धांचा समावेश केला जाईल. यासाठी सर्वेक्षणानंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ वृद्धांची यादी तयार केली जाईल. ही यादी सर्व सरकारी विभागांकडे असेल. शहराच्या विकास योजनांत त्यांच्याकडे असलेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर केला जाईल. आता एकटेपणाने त्रस्त होणार नाहीत वृद्ध वृद्धांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत मोबाइल क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. मानसिक आजारांनी त्रस्त वृद्धांचे मानसिक समुपदेशन केले जाईल. वृद्धांसाठी हेल्प डेस्कही असेल, जिथे ते कोणत्याही समस्येसाठी कॉल करून मदत घेऊ शकतील. तातडीच्या सेवाही उपलब्ध असतील. विविध ठिकाणी डे केअर सेंटर उघडण्यात येतील. येथे कुटुंबीय कामावर गेल्यानंतर एकटे राहणारे वृद्ध राहतील. येथे विविध उपक्रमही राबवले जातील. आयुष्याच्या या टप्प्यावर आपली वृद्ध मंडळी चांगले जीवन जगू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निधीच्या कमतरतेमुळे सुविधा कमी पडू देणार नाही. – आर्या राजेंद्रन, महापौर

Share