मनोहर जोशी, पंकज उधास यांना पद्मभूषण:अशोक सराफ, चैत्राम पवार, मारुती चितमपल्लींसह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या देशभरात १३९ जणांना पद‌्म पुरस्कार जाहीर केले. यात ७ मान्यवरांना पद्मविभूषण, १९ पद्मभूषण व ११३ पद्मश्रींचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद‌्मभूषण तर दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही याच पुरस्काराने गौरवण्यात आले. तर अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (सोलापूर), डॉक्टर विलास डांगरे (नागपूर) व वन्यजीवांसाठी काम करणारे चैत्राम पवार (धुळे) यांच्यासह राज्यातील ११ व्यक्तींना पद‌्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अच्युत पालव (कला), अरुंधती भट्टाचार्य, अभिनेते अशोक सराफ, गायिका अश्विनी भिडे, जसपिंदर नरुला, राणेंद्र भानू मुजुमदार (कला), सुभाष शर्मा (कृषी), वासुदेव कामत (कला) यांचा पद‌्मश्री पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. ३० अनोळखी नायकांना सन्मान ३० अनोळखी नायकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ७ जणांना पद्मविभूषणने सन्मानित केले. त्यात दुव्वुर नागेश्वर रेड्डी(तेलंगण), नि.न्या. जगदीश सिंग खेहर(छत्तीसगड), कुमूदिनी लखिया (गुजरात), लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कर्नाटक), एमटी वासुदेवन नायर(केरळ), ओसामू सुझुकी(जपान) व शारदा सिन्हा(बिहार)आहेत. पद्मश्री: गर्भाशयमुखाच्या कॅन्सर प्रतिबंधावर कार्य डॉ. नीरजा भाटला, गायनेकोलॉजिस्ट : दिल्लीच्या ६५ वर्षीय स्त्रीरोगतज्ज्ञ नीरजा भाटला यांनी गर्भाशयमुख कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी विशेष काम केले. एम्समधून निवृत्त झाल्यानंतर गर्भाशयमुख कॅन्सरवर अनेक संशोधने झाली. त्यांनी एक ॲपही बनवले. पद्मश्री: सॅली होळकर, सामाजिक कार्यकर्त्या मध्य प्रदेशच्या खरगोन येथील उद्योजक ८२ वर्षीय सॅली होळकर यांनी आयुष्यातील ५ दशके ३०० वर्षे जुन्या माहेश्वरी हँडलूम पुनरुज्जीवित करण्यासाठी घालवली. अमेरिकेत जन्मलेल्या सॅली यांनी महेश्वरमध्ये हातामागाच्या प्रशिक्षणासाठी शाळाही सुरू केली. पद्मश्री: चैतरामांनी १०० गावांचा चेहरा बदलला चैतराम देवचंद पवार, आदिवासी पर्यावरणवादी: धुळ्याचे पर्यावरणवादी आणि चैतराम पवार यांनी सामाजिक प्रयत्नातून महाराष्ट्र व गुजरातमधील १०० हून गावचा चेहरामोहरा बदलला. ९० च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापनाद्वारे त्यांनी ४०० हेक्टर वन संरक्षण केले. ५ हजारांहून जास्त झाडे लावली. कळसूत्री बाहुल्यांच्या कलाकारास पद्मश्री भीमव्वा डोड्डाबालप्पा, कला (कठपुतळी), कर्नाटक : ९६ वर्षीय कर्नाटकच्या पारंपरिक कलेत निपुण आहेत. चामड्याच्या कठपुतळीच्या या कलेला टोगलू गोंबेयाटा म्हणतात. त्या सुमारे ७० वर्षांपासून रामायण आणि महाभारतासारखे महाकाव्य कठपुतळीच्या माध्यमातून दाखवतात. पद्मश्री: लिबिया सरदेसाई, स्वातंत्र्यसैनिक १०२ वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिक लिबिया सरदेसाई यांनी पोर्तुगालपासून गोवा मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १९५५ मध्ये पती वामन सरदेसाईंसोबत मिळून भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केले. जंगलांत लपून रेडिओवरून स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केले होते.

Share