पिंपरी चिंचवड महापालिकेत विधानसभा उपसभापतींचा अवमान?:आयुक्त अनुपस्थित असल्याने अण्णा बनसोडेंचा संताप, मुख्यमंत्र्यांकडे करणार कारवाईची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेत विधानसभा उपसभापतींचा अवमान?:आयुक्त अनुपस्थित असल्याने अण्णा बनसोडेंचा संताप, मुख्यमंत्र्यांकडे करणार कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेत विधानसभा उपसभापतींचा अवमान?:आयुक्त अनुपस्थित असल्याने अण्णा बनसोडेंचा संताप, मुख्यमंत्र्यांकडे करणार कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहराचा नवीन विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी बनसोडे महापालिकेत आले होते, मात्र त्यावेळी आयुक्त शेखर सिंह अनुपस्थित होते. ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला गेले होते. इतर अतिरिक्त आयुक्तांनीही प्रोटोकॉल नुसार बनसोडेंना भेटायला पाहिजे होते, तसे न झाल्याने बनसोडे संतापले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बनसोडे यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून आयुक्तांचा निषेध केला. त्यांनी या घटनेची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्याची मागणी केली आहे, तसेच आयुक्तांवर राजकारण करत असल्याचा आरोपही केला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील आगामी थेट संघर्षाचे सूचक मानली जात आहे. अण्णा बनसोडे बोलताना म्हणाले, आज इथे आयुक्त थांबले नाहीत, हे चुकीचे आहे. पण त्यांना माहित नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम गेली दोन महिन्यापासून सुरू आहे. त्या विकास आराखड्यामध्ये खऱ्या अर्थाने जे आरक्षण टाकले आहेत, ते आरक्षण चुकीचे टाकलेले आहेत, प्रशासनावरती आणि यांच्यावरती देखरेख करायला पाहिजे, त्या पद्धतीने झालेले नाहीत, जवळजवळ 50 हजार हरकती आल्या होत्या. त्या सर्वांचा रोष धरूनच आज जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. पुढे बालताना अण्णा बनसोडे म्हणाले, जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडायला इथे आलो. मात्र, इथे आयुक्त नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. ते आयुक्त असले तरी ते पिंपरी चिंचवड शहराच्या भाग्यविधाते नाहीत. ते आज कमिशनर म्हणून इथे काम करत आहेत. त्यांचे आजचे वागणे दुर्दैवी आहे. आजच्या त्यांच्या वागण्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. आज या ठिकाणी पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रमुख नगरसेवक अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी आले होते, आमच्या सर्वांचा अपमान केला आहे. त्यामुळे आजचे हे निवेदन त्यांना न देता हेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या स्वाधीन करतील. आज या ठिकाणी जितके शिष्टमंडळ उपस्थित आहे हेच शिष्टमंडळ उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांनी निवेदन देतील, असेही पुढे अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *