दादरमधील कबुतर काढा अचानक बंद करणे योग्य नाही. या संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कबुतर खाना अचानक बंद करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या संदर्भात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. समाजातील लोकांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय समतोल निर्णय घेतला आहे. कबुतरांना अन्न टाकल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत असेल तर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून फीडिंग आणि साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एकाही कबुतराचा मृत्यू व्हायला नको, असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने कबुतरांचे फीडिंग आणि मशीनद्वारे स्वच्छता, साफसफाई करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे बैठकीनंतर मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे. नागरिकांचे जीवन देखील सर्वात महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात जास्त आहे. मात्र, त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको. त्या संदर्भातले स्पष्ट निर्देश फडणवीसांनी दिले. लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात जास्त आहे. मात्र त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको, यासाठी काही शास्त्रोक्त पद्धती असते. त्याचा अवलंब करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवला लोकांची भावना आणि शंभर वर्ष जुनी परंपरा लक्षात घेऊन या संदर्भातले महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे या संबंधी आवाज उठवणारे गिरिश महाजन यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवून एकही कबुतर मृत होऊ नये, यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा आम्हाला आनंद झाला असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.