प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो:कॉंग्रेस युवक नेत्याचा शरद कोळींना इशारा, सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच सकाळी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर आता कॉंग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आता पलटवार केला आहे. त्यांनी थेट शरद कोळी यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर येथील कॉंग्रेसचे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो, असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले होते. आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. तसेच, शरद कोळीची गाडी ज्या दिवशी ऑफिससमोर थांबेल, त्या दिवशी ती गाडी फोडणार, असा इशाराच काँग्रेसने दिला आहे. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये कॉंग्रेसने ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुएल महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे दिसत आहे. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता, तसेच शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असून यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा देखील शरद कोळी यांनी दिला होता. शरद कोळी म्हणाले, प्रणिती शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्या भाजपच्या बी टीम आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल उपस्थित करत हल्लाबोल केला आहे.

  

Share