ईव्ही-पेट्रोल वाहनांच्या किमती दोन वर्षांत बरोबरीत- गडकरी:अनुदानाच्या मुद्द्यावर रस्ते वाहतूक मंत्र्यांचे घुमजाव

इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग वाढल्याने पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमती बरोबरीत येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले अाहे. वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संघटना ‘एक्मा’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. लिथियम आयन बॅटरीच्या किमती घटल्याने ईव्ही निर्मितीवरील खर्च कमी झाला आहे. आगामी काळात तो आणखी घटेल, असे ते म्हणाले. अर्थमंत्री व अवजड उद्योगमंत्र्यांना अनुदान द्यावे वाटत असल्यास त्यामुळे ऑटोमाेटिव्ह क्षेत्राला त्याचा फायदाच होईल. मला काहीच अडचण नाही असे सांगून अनुदानाला विरोध करणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. मात्र यापूर्वी गडकरी यांनी ईव्ही निर्मिती करण्याचा खर्च घटल्याने कंपन्यांना आता अनुदानाची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. ग्राहक आपल्या पसंतीनुसार ईव्ही अथवा सीएनजी वाहनांची निवड करतोय. भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी ईव्ही वाहनांची ६.३% हिस्सेदारी होती, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment