पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर आक्षेप:पोलिस आयुक्तांचा मोठा खुलासा, म्हणाले- खेवलकर खडसेंचे जवाई आम्हाला माहीत नव्हते पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर आक्षेप:पोलिस आयुक्तांचा मोठा खुलासा, म्हणाले- खेवलकर खडसेंचे जवाई आम्हाला माहीत नव्हते

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर आक्षेप:पोलिस आयुक्तांचा मोठा खुलासा, म्हणाले- खेवलकर खडसेंचे जवाई आम्हाला माहीत नव्हते

पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका फ्लॅटमध्ये सुरु असलेली रेव्ह पार्टी उघडकीस आली. या कारवाईत पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणानंतर आता उलट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. राज्यातील काही नेत्यांनी या कारवाईबाबत शंका उपस्थित केली आहे. एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया देताना, माझ्या जावयाने आयुष्यात कधीही ड्रग्स पाहिलेले सुद्धा नाहीत, असा दावा केला आहे. प्रांजल खेवलकरसाठी एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी रोहिणी खडसे दोघेही उघडपणे मैदानात उतरताना दिसत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, पोलिसांची कारवाई, त्यामागील हेतू आणि सत्य काय आहे, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या अमितेशकुमार यांनी म्हटले की, खेवलकर हा खडसे यांचा जावई असल्याचे आम्हाला तपासात समजले. तोपर्यंत आम्हाला याबाबत कल्पना नव्हती. खराडी परिसरातील हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे कोकेन नेमके कोणी आणले होते, याबाबत तपास सुरू आहे. पुढे बोलताना अमितेशकुमार म्हणाले, आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रग्सचे सेवन कोणी केले, हे स्पष्ट होईल. कारवाईच्या पहिल्या दिवशी या हॉटेलमध्ये पार्टी झाली होती. त्या पार्टीत आणखी कोण होते, याची चौकशी सुरू असल्याचे म्हणणे आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या सात आरोपींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली असून, यामध्ये कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, पोलिसांनी साक्षी-पुरावे जमा करण्याच्या दृष्टीने मोबाईल फोन, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड जप्त केली आहेत. या झडतीत प्रांजल खेवलकर यांच्या घरासह इतर सहा आरोपींच्या घरी पोलिसांनी तपास केला. प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, पार्टीपूर्वी आरोपींनी एकमेकांशी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरून संपर्क साधला होता. त्यामुळे आता पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांच्या आधारे संवाद तपासला जात आहे. पार्टीचा आयोजक प्रांजल खेवलकरच- मंत्री गिरीश महाजन शुक्रवारी झालेल्या रेव्ह पार्टीत अटकेत असलेल्या सहा जणांपैकी दोन जण सहभागी होते. ही पार्टी पुण्याच्या खराडी परिसरातील बर्ड स्टे सूटमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याचे 25 ते 28 तारखेपर्यंतचे बुकिंग एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावानेच करण्यात आले होते. या बुकिंगच्या काही पावत्या देखील समोर आल्या आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही या पार्टीचा आयोजक प्रांजल खेवलकरच असल्याचे वक्तव्य केले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *