पंजाबचे CM भगवंत मान बनले गायक:कलाकार मित्रासोबत गायले ‘मघदा रहे वे सुरजा..’; दोघांनी पंजाबी इंडस्ट्रीत केले आहे एकत्र काम
पंजाबमधील 4 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासंदर्भात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान, सीएम भगवंत मान गुरुवारी होशियारपूरच्या झोन यूथ फेस्टिव्हलमध्ये पोहोचले. यावेळी सीएम मान आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि कलाकार करमजीत अनमोल गाणे गाताना दिसले. हा क्षण यामुळेही खास होता कारण, दोघे नेते पॉलीवूडचा भाग राहिलेले आहे आणि दोघेही कॉमेडीयन होते. सीएम मान आणि करमजीत अनमोल यांचा गाणे गातानाचा व्हिडियो सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. सीएम मान यांनीही या व्हिडिओला शेअर केले आहे. सीएम मान आणि करमजीत अनमोल यांनी ‘तु मघदा रहे वे सुरजा’ हे गाणे गायले. हे पंजाबचे जुने लोकगीत आहे. हे गाणे पंजाबच्या सभ्यतेबद्दल आहे. दोन्ही नेत्यांनी शास्त्रीय रागाचा वापर करुन गाणे गायले आणि नंतर लोकांनी त्यांचे कौतुकही केले. कोण आहेत करमजीत अनमोल जे सीएम मान यांच्या एवढे जवळचे आहेत लोकसभा निवडणुकीत आपने करमजीत अनमोलला फरीदकोटमधून उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र, आझाद उमेदवार खलिस्तान समर्थक सरबजीत सिंग खालसा यांनी त्यांचा पराभव केला. करमजीत सिंग अनमोल आणि सीएम भगवंत मान यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे दोघेही खूप जवळचे मित्र आहेत. करमजीत अनमोल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. करमजीत अनमोल यांनी पंजाबमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. यामध्ये कॅरी ऑन जट्टा 3, जी वाईफ जी, माँ दा शोना, हनीमून, तेरी-मेरी गल बन गई या चित्रपटांचा समावेश आहे. करमजीत अनमोल हे मुळचे संगरुरचे आहे. त्यांचा 1972 मध्ये जन्म झाला होता. पहिले ते केवळ कॉमेडी करायचे, परंतू त्यांना गाणे गाण्याची प्रचंड आवड आहे. पंजाबी लोकगायक कुलदीप मानक यांचे ते पुतणे आहे. मीडीया रिपोर्टनुसार, करमजीत यांनी 6 वर्षांचे असतानाच गाण्याचे प्रशिक्षण घेणे सुरु केले होते. याशिवाय त्यांना मिमिक्री करण्याचीही आवड आहे. करमजीत अनमोल यांचे शिक्षणही त्याच कॉलेजमध्ये झाले ज्या कॉलेजमध्ये सीएम मान यांचे शिक्षण झाले. दोघांनी एकत्र थिएटरही केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांची बॉलिवूड कारकीर्द… कॉलेज दरम्यान कलाकार बनले मान
भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 ला पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतौज गावात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले. अकरावीत त्यांनी शहीद उधम सिंग कॉलेज, सुनममध्ये प्रवेश घेतला होता. याच काळात मान यांनी कलाविश्वात प्रवेश केला. कॉलेजच्या स्टेजवर त्यांनी कॉमेडीयनच्या भुमिका करायला सुरुवात केली. सुरुवातीला मान स्टेजवर टिव्ही अँकरची नक्कल करायचे. हळुहळु मान कॉलेजच्या युवा महोत्सवात सहभागी होऊ लागले. त्यामुळे त्यांना प्रसिध्दीही मिळु लागली. त्यांनी पंजाब विद्यापीठात दोनदा सुवर्णपदक जिंकले. यानंतर मान यांनी त्यांचा सहकारी अभिनेता जगतार जग्गीसोबत जोडी बनवली. विनोदी कलाकार म्हणुन आपला ठसा उमटवला
पंजाबमध्ये अनेक कॉमेडी शो केल्यानंतर, सीएम मान यांनी 2008 मध्ये स्टार प्लसवरील ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतला. यानंतर संपुर्ण देशात त्यांनी विनोदी कलाकार म्हणुन आपली ओळख निर्माण केली. मान यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘मैं माँ पंजाब की’ या चित्रपटातही काम केले आहे. यानंतर सीएम मान यांनी 2014 मध्ये आपकडुन पहिली लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांनी 2,11,721 मतांनी विजय मिळवला. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी 1,11,111 मतांनी विजय मिळवला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 58,206 मतांनी विजयी होऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले.