पुण्याहून भुवनेश्वरला निघालेल्या विमानाला पक्षी धडकला:उजव्या बाजूचे पाच ब्लेड निकामी, पायलटच्या प्रसंगावधानाने 140 प्रवाशांचा जीव वाचला पुण्याहून भुवनेश्वरला निघालेल्या विमानाला पक्षी धडकला:उजव्या बाजूचे पाच ब्लेड निकामी, पायलटच्या प्रसंगावधानाने 140 प्रवाशांचा जीव वाचला

पुण्याहून भुवनेश्वरला निघालेल्या विमानाला पक्षी धडकला:उजव्या बाजूचे पाच ब्लेड निकामी, पायलटच्या प्रसंगावधानाने 140 प्रवाशांचा जीव वाचला

पुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्याने उड्डाण रद्द करण्यात आले आहे. पुण्याच्या विमानतळावरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेले 1098 हे विमान रद्द करावे लागले आहे. पक्षाच्या धडकेत विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले असल्याचा प्रकार पायलटच्या लक्षात आल्याने विमान उड्डाण तातडीने रद्द करण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विमानतळ व परिसरात कुत्रे, बिबट्या तसेच पक्षांच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे दिसते. पुणे विमानतळावर पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 या विमानाला बुधवारी अपघात होता होता टळला. उड्डाणावेळी धावपट्टीवर वेग घेत असताना विमानाला पक्षी धडकल्यामुळे हा प्रकार घडला. विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनला पक्षी आदळल्याने त्याचे पाच ब्लेड निकामी झाले. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखून वेळीच उड्डाण थांबवल्यामुळे विमानातील 140 प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेमुळे उड्डाण रद्द करण्यात आले, परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. याच विमानातील सीट क्रमांक 22 डी वरील प्रवासी मोहम्मद नदीम यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, इंजिनने वेग वाढवल्यावर त्यातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यानंतर लगेचच पायलटने ब्रेक दाबले आणि विमान थांबले. ब्रेक इतके जोरात लागले की काही प्रवाशांचे फोन खाली पडले आणि एका महिलेच्या हातून तिचे मूल जवळजवळ खाली पडले. नेमके काय घडले? बुधवारी सायंकाळी 4:05 वाजता पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 या विमानाला मोठा अपघात होता होता टळला. दीडशेहून अधिक प्रवासी घेऊन हे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असतानाच, त्याच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये पक्षी धडकला. यामुळे इंजिनमध्ये बिघाड झाला, मात्र पायलटने तातडीने उड्डाण थांबवून विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये सुरक्षितपणे आणले. पायलटच्या या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली, कारण जर हा प्रकार हवेत घडला असता तर मोठा अपघात झाला असता, असे हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने सांगितले आहे. पुणे विमानतळावर गेल्या काही वर्षांपासून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे विमानतळावर एकूण 145 ‘बर्ड हिट’च्या घटनांची नोंद झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एकट्या 2025 या वर्षात आतापर्यंत अशा 12 घटना घडल्या आहेत, आणि बुधवारी घडलेली ही 12 वी घटना आहे. या घटनेमुळे पुणे विमानतळावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *