दुर्गा देवीची ओढणी, बजरंगबलीचा रंगही लाल:तरीही फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का? भूपेश बघेल यांचा सवाल

दुर्गा देवीची ओढणी लाल रंगाची आहे. बजरंगबलीचा रंग लाल आहे. सूर्याच्या उगवतीचा आणि मावळतीचा रंगही लालच आहे. लाल हा उर्जेचा रंग आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का होत आहे, असा थेट सवाल छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विदर्भाचे प्रभारी भूपेश बघेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. नागपुरातील संविधान संमेलनात उपस्थितांना मुद्दे लिहून घेण्यासाठी लाल रंगाचे नोटपॅड देण्यात आले होते. त्यात रंगावर जाण्याचे कारण नव्हते. भाजपला पहिले हिरव्या रंगाचा त्रास होता. आता लाल रंगाचा त्रास आहे. देवेंद्र फडणवीस नैराश्यात असल्याने ते अशी वक्तव्ये करत आहे, असे बघेल म्हणाले. फडणवीसांना लाल रंगाची अॅलर्जी का? संविधान सन्मानफडणवीसांना लाल रंगाची अॅलर्जी का आहे?, कार्यक्रमात राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेली संविधानाची प्रत दाखवतात. त्यावरून फडणवीसांनी खरपूस टीका केली होती. नागपुरात एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था पाहायला मिळाली. लाल पुस्तक घेऊन त्यांना संविधानाचा गौरव करायचा नाही, तर त्यांच्यासोबत असलेले शहरी नक्षलवादी आणि अराजकतावादी यांना एक प्रकारे इशारा देण्यासाठी तसेच त्यांची मदत घेण्यासाठी हे नाटक केले आहे, अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर बोलताना बघेल यांनी फडणवीसांना लाल रंगाची अॅलर्जी का आहे?, असा सवाल केला. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात आले आहे. या नैराश्यातून ते असे बोलत असल्याचा आरोप बघेल यांनी केला. भाजपच्या सरकारमुळे लोक त्रस्त झाले आहे. उद्योजकांच्या हातात सर्व सत्ता आणि संपत्ती न एकवटता सर्वांना समान संधी मिळावी ही काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली आहे. त्यात लाडकी बहिण योजनेत 3 हजार दरमहा देण्याचे सांगितले आहे. भाजपवाले महाविकास आघाडी सरकार लाडकी बहिण योजना बंद पाडतील, असा भ्रामक प्रचार करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. गडकरींनी स्वत:कडे पाहावे आज इमर्जन्सीपेक्षा वाईट अवस्था आहे. सरकार विरोधात लिहिणाऱ्या विरूद्ध गुन्हे दाखल केले जातात. नितीन गडकरी यांनी काँग्रेसबद्दल चिंता करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे. त्यांचा जेवढा अपमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला. तेवढा यापूर्वी कधीही कुठल्याच पार्टीने केला नाही, असा टोला बघेल यांनी लगावला.

  

Share