आरक्षणाचे मारेकरी ही आता राहुल गांधींची ओळख:महामानवाच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा; खासदार नरेश म्हस्केंचे पत्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या संदर्भात आता पत्रांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वात आधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्याला पत्रानेच प्रत्युत्तर दिले होते. आता भाजप खासदार नरेश म्हस्के यांनी देखील राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. आपण आरक्षणाचे मारेकरी आहात, ही आता तुमची ओळख झाली आहे. त्यामुळे महामानवाच्या स्मृतिस्थळासमोर जाऊन नाक घासा, क्षमा मागा, एवढे तरी करा, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांना केले आहे. नरेश म्हस्के यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा….
आदरणीय श्री. राहुल गांधीजी, जय महाराष्ट्र अत्यंत उ‌द्वेगाने हे पत्र आपल्याला लिहीत आहे, त्यामुळे पत्राच्या भाषेत काही अधिकउणे झाल्यास भावना समजून घ्याव्यात. अर्थात भाषेसंदर्भात आमच्याकडून आगळीक झाली तरी तुम्ही मनावर घेणार नाही, याचा विश्वास वाटतो. कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याब‌द्दल बोलताना तुम्ही जी बेलगाम भाषा वापरता, त्या तुलनेत है सौम्यच आहे. आपण सोडून बाकीची भारतीय जनता ही दुय्यम दर्जाची आणि खरे तर गुलामच आहे, अशी आपली धारणा झाली आहे. दलित आणि गरीबांशी बोलताना तुमच्या भाषेतून सरंजामी डौल दिसतो, आजच्या भाषेत सांगायचे तर तुमच्यासारख्यांना संपूर्ण देश आणि देशातील जनता ‘बाप का माल’ वाटतो. आयुष्यभर कधी गरीबी आणि विवंचना न पाहिलेल्या श्रीमंताच्या दिवट्‌या पोरासारखी आपली गत झाली आहे. तरीही आमच्या संस्कृतीप्रमाणे सभ्य शब्दात, पण वस्तुस्थिती लिहिण्याचे धाडस करतो आहे. आपल्या अफाट बुध्दिमतेचे आणि आपल्या विनोदबुध्दीचे दर्शन अधूनमधून संसदेच्या पवित्र सभागृहात घडते. आपल्या विनोद बु‌द्धीपुढे चार्ली चॅप्लीनपासून जॉनी लिव्हरपर्यंत तमाम विनोदवीरांना मान खाली घालावी लागेल, समाज माध्यमांवर तर आपण कमालीचे लोकप्रिय आहात. आपल्यासारख्यांना फारसे मनावर घेण्याची गरज नाही, चार घटका मनोरंजन एवढेच आपले भारतीय राजकारणातले मोल आहे, असे समजून चाललो होतो. पण काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात. अमेरिकेच्या दौऱ्यात तेथील एका वि‌द्यापीठात बोलताना आपण ‘योग्य वेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय आमचे सरकार घेईल असे म्हणाल्याचे वृतपत्रात वाचले. दूरचित्रवाणीवर पाहिले. क्षणभर विश्वास बसेना। एक जबाबदार नागरिक असे उद्‌गार कधीही काढणार नाही, पण हे बोलताना तुमची जीभ जराही कचरली नाही. किती तो अहंकार। परदेशातील तरुणाईसमोर गमजा मारण्यासाठी तुम्ही बेजबाबदारपणाने जे बडबडलात, त्यामुळे त्या तरुणांचे काहीच बिघडले नसावे. पण तुमच्या वक्तव्याने येथील लाखो दलित, शोषित आणि वंचितांची तरुण मुले कमालीची अस्वस्थ झाली. त्यांची अंतःकरणे वेदनेने पिळवटून गेली. आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा खरा सवाल आहे. कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्व काय? दलितांना आरक्षण तुम्ही दिलेले नाही, त्यामुळे तुम्ही ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, तेव्हा दलितांना आरक्षणाची गरज असल्याचे नमूद करून आवर्जून तसा कायदा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांना या निर्णयाप्रत येण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला होता. बरावाईट अनुभव, अभ्यास, प्रकांड जान आणि माणुसकीची प्रखर जाणीव या गोष्टीमुळे त्यांनी आरक्षणाचे महत्व ओळखले. आरक्षणासंबंधीचे त्यांचे विचार लपून राहिलेले नव्हते. किंबहुना तुमचे पणजोबा पं. जवाहरलाल नेहरु यांनाही ते नीट माहीत होते. इतकेच नव्हे, तर त्या महामानवाचा जमेल तेवढा दुस्वास काँग्रेसमधील नेहरु समर्थकांनी तेव्हाही केलाच, खुद्ध पं. नेहरु यांचे आरक्षणाबाबतचे विचार तुम्हाला परिचित असतीलय, नसतील, तर ते वाचून घ्यावेत. आपले पणजोबा, आजी, वडील, आई यांच्या पावलावर पाऊल टाकून तुमची आरक्षणविरोधी वाटचाल सुरु आहे, एवढेच म्हणता येईल. महामानव मूल्य डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना संविधान सभेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा चंग बांधून नेहरूसमर्थक काँग्रेसी पिलावळीने काय काय कारस्थाने केली. याचा इतिहास उपलब्ध आहे. तरीही डॉ. बाबासाहेब सर्वांना पुरुन उरले. त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये दोनदा ठरवून पराभूत करण्यात आले. तेही काँग्रेसच्याच उघड विरोधानिशी. काँग्रेसने अनिच्छेनेच आरक्षण स्वीकारले, कारण ती त्यांची राजकीय गरज बनली होती. दलितांचा उध्दार व्हावा, असे काँग्रेसला कधीच मनापासून वाटले नाही. आपल्या आज्जी स्वगर्गीय इंदिरा गांधी याच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनेही दलितांकडे एक मतपेटी म्हणूनच पाहिले. आरक्षण हे त्यांच्यासाठी केवळ गाजर होते. त्यांच्या पश्चात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या स्वर्गीय राजीव गांधी यांनी तर सर्वावर कळस चढवला. त्यांची दलिताप्रति असलेती तुप्छता कधीच लपून राहिली नाही. आलिशान राहणी असलेल्या सत्ताधीशांना दलित, वंचित आणि शोषिताची कसली आली आहे पर्वा? आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी अंजय्या यांचा तर जाहीर पाणउतारा करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. दलित नेत्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहात असे. पण यांच्या आड्‌यतेला अंत नव्हता. बेमुर्वतखोरपणाचा कहर म्हणजे काही महिन्यांपूर्वी तुमचेच ‘फारेनचे आदरणीय गुरुवर्य सॅम पित्रोडा यांनी संविधान निर्मितीच्या कामात डॉ. आंबेडकरांपेक्षा पं. नेहरूचेच योगदान भरीव असल्याचा शोध लावला, आणि बेशरमपणाने तो लेख प्रसिध्द‌ केला. आणि आता तुम्ही अकलेचे तारे तोडलेत| गरीबी ही एक मानसिक अवस्था आहे, असे म्हणणारे तुम्हीच होता, हे सहज आठवले. आरक्षण ही दलितांसाठी संजीवनी आहे. जगण्याची मूलभूत गरज आहे. उध्दाराचा एकमेव मार्ग आहे. पण दुर्दैवाने आरक्षणाचा हळवा मुद्‌दा तुमच्यासारख्या राजकारण्यांना केवळ एक मुद्दा वाटतो. ठोक भावात मते मिळवण्याचा मार्ग वाटतो. आरक्षण नसेल तर तुमचे काहीच अडत नाही. दलित बिचारे जातात कुठे? विविध गटांमध्ये वाटली गेलेली दलित जनता फरफटत सत्तेमागेच येईल, हे तुमचे गृहितक सरंजामी प्रवृतीचे वाटते. बरे झाले, तुमच्या पोटातले, परदेशात का होईना, पण ओठांवर आले. तुमचे खरे स्वरूप उघड झाले. तुमचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे वेगळे. तुम्ही ‘मोहब्बत की दुकान उघडले आहे, असे म्हणता. पण प्रत्यक्षात ते दमन की दुकान आहे. दलित, शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचे दुकान आहे. अमेरिकेत तुम्ही गुर्मीत जे उद्‌गार काढले, त्यामुळे देशातला दलित तरुण आता खडबडून जागा होईल, असा विश्वास वाटतो. राहुलजी, तुम्ही पदयात्रा वगैरे काढला. पण त्या नौटंकीला आता किमान न्याययात्रा वगैरे गौडस नावे देऊ नका तुम्ही न्याय देऊ शकणार नाही, नव्हे, तुम्हाला तो द्यायचाच नाही. पुन्हा यात्रेवित्रेच्या भानगडीत पड़ाल, तर ज्या गावात तुमचे स्वागत झाले, तिथेच तुम्हाला दलितांचे संतप्त चेहरे दिसतील, आरक्षणाचे मारेकरी ही आता तुमची ओळख बनली आहे.

​काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या संदर्भात आता पत्रांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वात आधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्याला पत्रानेच प्रत्युत्तर दिले होते. आता भाजप खासदार नरेश म्हस्के यांनी देखील राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. आपण आरक्षणाचे मारेकरी आहात, ही आता तुमची ओळख झाली आहे. त्यामुळे महामानवाच्या स्मृतिस्थळासमोर जाऊन नाक घासा, क्षमा मागा, एवढे तरी करा, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांना केले आहे. नरेश म्हस्के यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा….
आदरणीय श्री. राहुल गांधीजी, जय महाराष्ट्र अत्यंत उ‌द्वेगाने हे पत्र आपल्याला लिहीत आहे, त्यामुळे पत्राच्या भाषेत काही अधिकउणे झाल्यास भावना समजून घ्याव्यात. अर्थात भाषेसंदर्भात आमच्याकडून आगळीक झाली तरी तुम्ही मनावर घेणार नाही, याचा विश्वास वाटतो. कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याब‌द्दल बोलताना तुम्ही जी बेलगाम भाषा वापरता, त्या तुलनेत है सौम्यच आहे. आपण सोडून बाकीची भारतीय जनता ही दुय्यम दर्जाची आणि खरे तर गुलामच आहे, अशी आपली धारणा झाली आहे. दलित आणि गरीबांशी बोलताना तुमच्या भाषेतून सरंजामी डौल दिसतो, आजच्या भाषेत सांगायचे तर तुमच्यासारख्यांना संपूर्ण देश आणि देशातील जनता ‘बाप का माल’ वाटतो. आयुष्यभर कधी गरीबी आणि विवंचना न पाहिलेल्या श्रीमंताच्या दिवट्‌या पोरासारखी आपली गत झाली आहे. तरीही आमच्या संस्कृतीप्रमाणे सभ्य शब्दात, पण वस्तुस्थिती लिहिण्याचे धाडस करतो आहे. आपल्या अफाट बुध्दिमतेचे आणि आपल्या विनोदबुध्दीचे दर्शन अधूनमधून संसदेच्या पवित्र सभागृहात घडते. आपल्या विनोद बु‌द्धीपुढे चार्ली चॅप्लीनपासून जॉनी लिव्हरपर्यंत तमाम विनोदवीरांना मान खाली घालावी लागेल, समाज माध्यमांवर तर आपण कमालीचे लोकप्रिय आहात. आपल्यासारख्यांना फारसे मनावर घेण्याची गरज नाही, चार घटका मनोरंजन एवढेच आपले भारतीय राजकारणातले मोल आहे, असे समजून चाललो होतो. पण काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात. अमेरिकेच्या दौऱ्यात तेथील एका वि‌द्यापीठात बोलताना आपण ‘योग्य वेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय आमचे सरकार घेईल असे म्हणाल्याचे वृतपत्रात वाचले. दूरचित्रवाणीवर पाहिले. क्षणभर विश्वास बसेना। एक जबाबदार नागरिक असे उद्‌गार कधीही काढणार नाही, पण हे बोलताना तुमची जीभ जराही कचरली नाही. किती तो अहंकार। परदेशातील तरुणाईसमोर गमजा मारण्यासाठी तुम्ही बेजबाबदारपणाने जे बडबडलात, त्यामुळे त्या तरुणांचे काहीच बिघडले नसावे. पण तुमच्या वक्तव्याने येथील लाखो दलित, शोषित आणि वंचितांची तरुण मुले कमालीची अस्वस्थ झाली. त्यांची अंतःकरणे वेदनेने पिळवटून गेली. आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा खरा सवाल आहे. कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्व काय? दलितांना आरक्षण तुम्ही दिलेले नाही, त्यामुळे तुम्ही ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, तेव्हा दलितांना आरक्षणाची गरज असल्याचे नमूद करून आवर्जून तसा कायदा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांना या निर्णयाप्रत येण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला होता. बरावाईट अनुभव, अभ्यास, प्रकांड जान आणि माणुसकीची प्रखर जाणीव या गोष्टीमुळे त्यांनी आरक्षणाचे महत्व ओळखले. आरक्षणासंबंधीचे त्यांचे विचार लपून राहिलेले नव्हते. किंबहुना तुमचे पणजोबा पं. जवाहरलाल नेहरु यांनाही ते नीट माहीत होते. इतकेच नव्हे, तर त्या महामानवाचा जमेल तेवढा दुस्वास काँग्रेसमधील नेहरु समर्थकांनी तेव्हाही केलाच, खुद्ध पं. नेहरु यांचे आरक्षणाबाबतचे विचार तुम्हाला परिचित असतीलय, नसतील, तर ते वाचून घ्यावेत. आपले पणजोबा, आजी, वडील, आई यांच्या पावलावर पाऊल टाकून तुमची आरक्षणविरोधी वाटचाल सुरु आहे, एवढेच म्हणता येईल. महामानव मूल्य डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना संविधान सभेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा चंग बांधून नेहरूसमर्थक काँग्रेसी पिलावळीने काय काय कारस्थाने केली. याचा इतिहास उपलब्ध आहे. तरीही डॉ. बाबासाहेब सर्वांना पुरुन उरले. त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये दोनदा ठरवून पराभूत करण्यात आले. तेही काँग्रेसच्याच उघड विरोधानिशी. काँग्रेसने अनिच्छेनेच आरक्षण स्वीकारले, कारण ती त्यांची राजकीय गरज बनली होती. दलितांचा उध्दार व्हावा, असे काँग्रेसला कधीच मनापासून वाटले नाही. आपल्या आज्जी स्वगर्गीय इंदिरा गांधी याच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनेही दलितांकडे एक मतपेटी म्हणूनच पाहिले. आरक्षण हे त्यांच्यासाठी केवळ गाजर होते. त्यांच्या पश्चात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या स्वर्गीय राजीव गांधी यांनी तर सर्वावर कळस चढवला. त्यांची दलिताप्रति असलेती तुप्छता कधीच लपून राहिली नाही. आलिशान राहणी असलेल्या सत्ताधीशांना दलित, वंचित आणि शोषिताची कसली आली आहे पर्वा? आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी अंजय्या यांचा तर जाहीर पाणउतारा करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. दलित नेत्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहात असे. पण यांच्या आड्‌यतेला अंत नव्हता. बेमुर्वतखोरपणाचा कहर म्हणजे काही महिन्यांपूर्वी तुमचेच ‘फारेनचे आदरणीय गुरुवर्य सॅम पित्रोडा यांनी संविधान निर्मितीच्या कामात डॉ. आंबेडकरांपेक्षा पं. नेहरूचेच योगदान भरीव असल्याचा शोध लावला, आणि बेशरमपणाने तो लेख प्रसिध्द‌ केला. आणि आता तुम्ही अकलेचे तारे तोडलेत| गरीबी ही एक मानसिक अवस्था आहे, असे म्हणणारे तुम्हीच होता, हे सहज आठवले. आरक्षण ही दलितांसाठी संजीवनी आहे. जगण्याची मूलभूत गरज आहे. उध्दाराचा एकमेव मार्ग आहे. पण दुर्दैवाने आरक्षणाचा हळवा मुद्‌दा तुमच्यासारख्या राजकारण्यांना केवळ एक मुद्दा वाटतो. ठोक भावात मते मिळवण्याचा मार्ग वाटतो. आरक्षण नसेल तर तुमचे काहीच अडत नाही. दलित बिचारे जातात कुठे? विविध गटांमध्ये वाटली गेलेली दलित जनता फरफटत सत्तेमागेच येईल, हे तुमचे गृहितक सरंजामी प्रवृतीचे वाटते. बरे झाले, तुमच्या पोटातले, परदेशात का होईना, पण ओठांवर आले. तुमचे खरे स्वरूप उघड झाले. तुमचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे वेगळे. तुम्ही ‘मोहब्बत की दुकान उघडले आहे, असे म्हणता. पण प्रत्यक्षात ते दमन की दुकान आहे. दलित, शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचे दुकान आहे. अमेरिकेत तुम्ही गुर्मीत जे उद्‌गार काढले, त्यामुळे देशातला दलित तरुण आता खडबडून जागा होईल, असा विश्वास वाटतो. राहुलजी, तुम्ही पदयात्रा वगैरे काढला. पण त्या नौटंकीला आता किमान न्याययात्रा वगैरे गौडस नावे देऊ नका तुम्ही न्याय देऊ शकणार नाही, नव्हे, तुम्हाला तो द्यायचाच नाही. पुन्हा यात्रेवित्रेच्या भानगडीत पड़ाल, तर ज्या गावात तुमचे स्वागत झाले, तिथेच तुम्हाला दलितांचे संतप्त चेहरे दिसतील, आरक्षणाचे मारेकरी ही आता तुमची ओळख बनली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment