रायगडमध्ये 6 बलात्कार विजय वडेट्टीवार यांचा दावा:पोलिस आधीक्षकांनी फेटाळला आरोप, म्हणाल्या जनतेत गैरसमज पसरला जाईल रायगडमध्ये 6 बलात्कार विजय वडेट्टीवार यांचा दावा:पोलिस आधीक्षकांनी फेटाळला आरोप, म्हणाल्या जनतेत गैरसमज पसरला जाईल

रायगडमध्ये 6 बलात्कार विजय वडेट्टीवार यांचा दावा:पोलिस आधीक्षकांनी फेटाळला आरोप, म्हणाल्या जनतेत गैरसमज पसरला जाईल

राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्याचे उदाहरण देत गंभीर दावा केला. रायगडमध्ये एका दिवसात 6 बलात्काराच्या घटना घडल्या, तर उर्वरित महाराष्ट्राची काय अवस्था असेल? असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यांनी सरकारवर टीका करत महिलांवर अत्याचार वाढत असताना, सरकार शक्ती कायदा लागू का करत नाही? अशीही टिप्पणी केली. मात्र, वडेट्टीवार यांचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करत रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी या वक्तव्याला फेटाळून लावले आहे. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 बलात्काराच्या घटना घडल्या नसून, हा दावा पूर्णतः चुकीचा आहे, असे दलाल यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बलात्काराच्या घटना घडल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना केला. मात्र, हा दावा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट करत रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळा तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावर 10 दिवसांपूर्वी आशा वर्कर्सनी घेतलेल्या आरोग्य शिबिरात काही अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे समोर आले होते. मात्र, या गर्भधारणांची वेळ एकसंध नसून त्या वेगवेगळ्या कालखंडातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित मुलींचे त्या मुलांशी विवाहही पार पाडण्यात आले आहेत. तळा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी तो आदिवासी समाजाच्या इच्छेविरुद्ध नव्हता, तर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवत, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोंदवण्यात आल्याचे दलाल यांनी सांगितले. त्यामुळे एका दिवसात सहा बलात्कार घडल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असून, जनतेमध्ये गैरसमज पसरवणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या राज्यातील बळीराजा सध्या गंभीर संकटात असून, केवळ जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता शेतकऱ्यांची दयनीय अवस्था स्पष्ट होते, असे मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करत असतानाही त्याला योग्य मोबदला मिळत नाही, परिणामी त्याला मृत्यूला कवटाळावे लागते, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. कधी कोरडा दुष्काळ, कधी अति पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे आणि त्याचे स्वप्न चुरगाळले जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात खरे परिवर्तन घडवायचे असेल, तर आधुनिक आणि संपन्न शेतीच्या दिशेने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे सांगून वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. बळीराजा सर्वांना पोसतो, आणि त्याचाच अपमान राज्यातील सत्ताधारी करत आहेत. तुम्ही काही देऊ शकत नसाल तरी त्याला हिणवू नका. कृषिमंत्र्यांना पंढरीच्या विठोबाची सद्बुद्धी लाभो,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *