‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित रांगोळी स्पर्धा:वाचकांच्या उदंड प्रतिसादाने रंगला उत्सव, स्पर्धेत रंगली चुरस‎; महिला संरक्षणाच्या प्रश्नावर व्यक्त झाले स्पर्धक

‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित रांगोळी स्पर्धा:वाचकांच्या उदंड प्रतिसादाने रंगला उत्सव, स्पर्धेत रंगली चुरस‎; महिला संरक्षणाच्या प्रश्नावर व्यक्त झाले स्पर्धक

“दैनिक दिव्य मराठी’ आणि कल्याण‎ग्रुप आयोजित रांगोळी स्पर्धेत तीन‎गटांमध्ये ५५ स्पर्धकांनी सहभाग‎नोंदवला. महिला अत्याचारांच्या‎सद्य:स्थितीवर भाष्य करत स्पर्धकांनी‎रसिकांना स्तब्ध केले. या स्पर्धेत‎बच्चे कंपनीसह पुरुषांनीही सहभाग‎घेत शहरातील कलाविश्वाचा परिचय‎दिला. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत‎सृष्टी चांदणे, शिल्पा सानप आणि‎अमोल क्षीरसागर हे पिठाची गिरणी‎या पहिल्या पारितोषिकाचे मानकरी‎ ठरले.‎ पैठण रोडवरील कल्याण ग्रुपच्या ‎‎कल्याण सेलिब्रेशन हॉल येथे‎झालेल्या “दिव्य मराठी’ गणेशोत्सव ‎‎-२०२४ अंतर्गत ढोल स्पर्धा,‎चित्रकला स्पर्धा आणि शेवटच्या‎दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन ‎‎करण्यात आले होते. यामध्ये ६ ते ७‎हजार स्पर्धक-नागरिकांनी हजेरी‎लावली. रांगोळी स्पर्धेने उत्सवाचा ‎‎समारोप झाला.‎ कल्याण सेलिब्रेशन्स येथे १४०० किलोंच्या विक्रमी महामोदक सर्वांचे आकर्षण ठरला. या वेळी कल्याण ग्रुपचे‎संचालक आनंद गर्ग, सुजल अग्रवाल, गोविंद अग्रवाल, तेजस कमानी, संजय लुलेकर,‎हारुण शेख, अनिल सोनी, किशनदास अग्रवाल, राम दाखणे, गणेश अग्रवाल, दीपक‎चौधरी, रवी कुंदलवाल, राहुल जाधव, कार्तिक अग्रवाल.‎ कल्याण ग्रुपचे गोविंद अग्रवाल, टीना अग्रवाल, भारती अग्रवाल, माजी महापाैर अनिता घोडेले, काँग्रेसचे जितेंद्र देहाडे,राष्ट्रवादी‎अजीत पवार गटाचे युवा शहरप्रमुख मयूर सोनवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, जनार्दन कांबळे, नीता जगताप , शैकत पटेल आदी उपस्थित होते.
स्तब्ध करून गेल्या रांगोळ्या‎
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार‎प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.‎लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यसंग्राम‎सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून सार्वजनिक‎गणेशोत्सव साजरा केला. यामध्ये‎कलेच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले.‎त्याचीच प्रचिती दिव्य मराठी उत्सवात‎आली. अत्यंत चिंतनशील रांगोळ्यांतून‎स्पर्धकांनी देशभरात महिलांवर होणाऱ्या‎अत्याचारांवर भाष्य केले.‎ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणामुळे समाज हेलावून गेला. त्याची प्रचिती ‘दिव्य मराठी’ व कल्याण सेलिब्रेशन्स यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवारी आयोजित रांगोळी स्पर्धेत आली. रांगोळी स्पर्धेत महिला अत्याचाराचा विषय स्पर्धकांनी जोरकसपणे मांडला. महिलांची विविध क्षेत्रांतील भरारी, महिला अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण आदी विषयांवर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्यातून समाजाने महिलांच्या प्रश्नांकडे, सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याचा संदेश दिला. ​​​​​​

​”दैनिक दिव्य मराठी’ आणि कल्याण‎ग्रुप आयोजित रांगोळी स्पर्धेत तीन‎गटांमध्ये ५५ स्पर्धकांनी सहभाग‎नोंदवला. महिला अत्याचारांच्या‎सद्य:स्थितीवर भाष्य करत स्पर्धकांनी‎रसिकांना स्तब्ध केले. या स्पर्धेत‎बच्चे कंपनीसह पुरुषांनीही सहभाग‎घेत शहरातील कलाविश्वाचा परिचय‎दिला. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत‎सृष्टी चांदणे, शिल्पा सानप आणि‎अमोल क्षीरसागर हे पिठाची गिरणी‎या पहिल्या पारितोषिकाचे मानकरी‎ ठरले.‎ पैठण रोडवरील कल्याण ग्रुपच्या ‎‎कल्याण सेलिब्रेशन हॉल येथे‎झालेल्या “दिव्य मराठी’ गणेशोत्सव ‎‎-२०२४ अंतर्गत ढोल स्पर्धा,‎चित्रकला स्पर्धा आणि शेवटच्या‎दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन ‎‎करण्यात आले होते. यामध्ये ६ ते ७‎हजार स्पर्धक-नागरिकांनी हजेरी‎लावली. रांगोळी स्पर्धेने उत्सवाचा ‎‎समारोप झाला.‎ कल्याण सेलिब्रेशन्स येथे १४०० किलोंच्या विक्रमी महामोदक सर्वांचे आकर्षण ठरला. या वेळी कल्याण ग्रुपचे‎संचालक आनंद गर्ग, सुजल अग्रवाल, गोविंद अग्रवाल, तेजस कमानी, संजय लुलेकर,‎हारुण शेख, अनिल सोनी, किशनदास अग्रवाल, राम दाखणे, गणेश अग्रवाल, दीपक‎चौधरी, रवी कुंदलवाल, राहुल जाधव, कार्तिक अग्रवाल.‎ कल्याण ग्रुपचे गोविंद अग्रवाल, टीना अग्रवाल, भारती अग्रवाल, माजी महापाैर अनिता घोडेले, काँग्रेसचे जितेंद्र देहाडे,राष्ट्रवादी‎अजीत पवार गटाचे युवा शहरप्रमुख मयूर सोनवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, जनार्दन कांबळे, नीता जगताप , शैकत पटेल आदी उपस्थित होते.
स्तब्ध करून गेल्या रांगोळ्या‎
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार‎प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.‎लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यसंग्राम‎सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून सार्वजनिक‎गणेशोत्सव साजरा केला. यामध्ये‎कलेच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले.‎त्याचीच प्रचिती दिव्य मराठी उत्सवात‎आली. अत्यंत चिंतनशील रांगोळ्यांतून‎स्पर्धकांनी देशभरात महिलांवर होणाऱ्या‎अत्याचारांवर भाष्य केले.‎ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणामुळे समाज हेलावून गेला. त्याची प्रचिती ‘दिव्य मराठी’ व कल्याण सेलिब्रेशन्स यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवारी आयोजित रांगोळी स्पर्धेत आली. रांगोळी स्पर्धेत महिला अत्याचाराचा विषय स्पर्धकांनी जोरकसपणे मांडला. महिलांची विविध क्षेत्रांतील भरारी, महिला अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण आदी विषयांवर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्यातून समाजाने महिलांच्या प्रश्नांकडे, सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याचा संदेश दिला. ​​​​​​  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment