गुजरात आणि राजस्थानमध्ये बलात्काराच्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ८६ वर्षीय आसारामला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने आज ८ ऑगस्ट रोजी आसारामने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी केली. न्यायालयाने अंतरिम जामीन २९ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. आसारामच्या वतीने वकील निशांत बोर्डा यांनी अलीकडील वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केले. यापूर्वी, गुजरात उच्च न्यायालयानेही याच कारणावरून आसारामचा अंतरिम जामीन २९ ऑगस्टपर्यंत वाढवला होता. गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आसारामची ‘ट्रोपोनिन पातळी’ खूप जास्त असल्याचे उघड झाले. ही चिंतेची बाब आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, आसारामची प्रकृती गंभीर आहे. सध्या तो इंदूरमधील ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे.


By
mahahunt
11 August 2025